नगर वाचन मंदिराच्या वार्षिक सभेत जेष्ठ नागरिकांचा सत्कार
चोपडा,दि.२(प्रतिनिधी) - येथील अमरचंद सभागृहात तालुका वाचनालय असलेले नगर वाचन मंदिराची वार्षीक सर्वसाधारण सभा अध्यक्ष आशिष गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्ताने प्रतिमा पुजन करण्यात आले.तसेच गिताईचा पंधरावा अध्याय पठन करण्यात आला.यावेळी अहवाल वाचन कार्यवाह गोविंद गुजराथी यांनी केले.तर आर्थिक पत्रकांचे वाचन कार्यवाह डॅा.परेश टिल्लू यांनी सादर केले.यावेळी सात विषयांवर खेळीमेळीत चर्चा करण्यात येवून सभा संपन्न झाली.नुकतेच साज-या झालेल्या जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून नगर वाचन मंदिरातर्फे जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संचालक किरण गुजराथी,श्रीकांत नेवे,संजीव गुजराथी,सुरेंद्र जैन, अवधूत ढबू,व्ही.एस.पाटील,अविनाश कुलकर्णी,स्नेहल पोतदार,प्रभाकर महाजन,धिरेंद्र जैन, रजनी सराफ यांचेसह वाचक व सभासद उपस्थित होते. सभा यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल गोपाळ दांडेकर,रमेश सोनार,लाड यांनी परिश्रम घेतले.