..त्या समाजकंटकांना त्वरित अटक करा .. जळगाव जिल्हा तेली समाजाची मागणी

 ..त्या समाजकंटकांना  त्वरित अटक  करा .. जळगाव जिल्हा तेली समाजाची मागणी      

               

चोपडा,दि.३१(प्रतिनिधी) मराठा आरक्षण आंदोलन संदर्भात ठिकठिकाणी शांततेत मोर्चा आणि निवेदन होत असताना बीडमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागले. अखिल भारतीय तेली समाजाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री जयदत्तजी क्षीरसागर व आमदार श्री संदीप जी क्षीरसागर यांचे घर काही समाजकंटकांनी जाळले. जाळण्याची घटना अत्यंत क्लेशदायक असून अशा समाज कंटकांचा जळगाव जिल्हा तेली समाजातर्फे जाहीर निषेध करण्यात येत आहे. 

या घटनेचा प्रदेश तेली महासंघ जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री के. डी .चौधरी, महिला जिल्हाध्यक्ष सौ निर्मलाताई चौधरी, विभागीय युवक कार्याध्यक्ष प्रशांत सुरडकर, प्रशांत चौधरी आदी पदाधिकाऱ्यांनी   तीव्र निषेध व धिक्कार केला असून अशा समाज कंटकांना त्वरित अटक करून त्यांना कडक शासन व्हावे अशी मागणी केली आहे. अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल असे के. डी. चौधरी यांनी ठणकावून सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने