भगवत भक्ती द्वारेच भगवतप्राप्ती शक्य... ह.भ.प.पांडुरंग महाराज घुले यांचे प्रतिपादन....
चोपडा,दि.३० (प्रतिनिधी) :----भगवत प्राप्तीची उपलब्धी याच मानवी जीवनामध्ये होऊ शकते म्हणून आपण किती लक्ष देत - दक्ष होऊन भगवत भक्ती करतो याला अधिक महत्त्व आहे. भगवत भक्ती जर प्रामाणिक असेल तर भगवत प्राप्ती शक्य असल्याचे प्रतिपादन हभप पांडूरंग महाराज घुले यांनी तावसे बु!! तालुका चोपडा येथे वैकुंठवासी अमृत काशीराम चौधरी व वैकुंठवासी ग भा मंदोदरी अमृत चौधरी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित तीन दिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन ह. भ. प नरहरी महाराज चौधरी सचिव वारकरी महामंडळ महाराष्ट्र यांनी केले होते त्या प्रसंगी ते बोलत होते.
वारकरी संप्रदाय संतानुमोदीत अशी एक वैचारिक व सकल समा उद्धारक मार्गदर्शक अशी परंपरा आहे. या वारकरी संप्रदायाचे महाराष्ट्रातील अनेक जाती धर्माचे अनुयायी या परंपरेमध्ये आपल्या जीवनाला सुख आणि शांतीच्या मार्गाचा अवलंब करून वाटचाल करत आहेत.एक संस्कारक्षम व सदा आपापल्या उद्योगांमध्ये रत ठेवणारी अशी आदर्शवत परंपरा असून या परंपरेमध्ये पाईकत्व स्वीकारून आपल्या जीवनाला एक प्रकारची शांत आणि सुखरूपता निर्माण करून संसारी जीवनाबरोबर पारलौकिक जीवनही सुखकर करण्यारी विचार प्रणाली आहे., म्हणून खूप असा परिवार व्यक्तिगत जीवन, कौटुंबिक जीवन या परंपरेमध्ये आपलं योगदान देत आहेत. याच परंपरेमध्ये रत असणारे वैकुंठवासी अमृत काशीराम चौधरी व वैकुंठवासी मंदोदरी अमृत चौधरी या उभयतांचा पुण्यस्मरण सोहळा जळगाव तालुका चोपडा तावसे बुद्रुक येथे तीन दिवसीय संपन्न होत असताना श्रीक्षेत्र आळंदी येथून व महाराष्ट्रातून काही कीर्तनकार मंडळी या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रम अतिशय छान पद्धतीने संपन्न करण्यात आला .या तीन दिवसीय कीर्तन महोत्सवात सप्ताहामध्ये हभप आबा महाराज गोडसे ( महाराष्ट्राचे वारकरी संप्रदायाचे भीमसेन ) पहिले कीर्तन यांचे संपन्न होऊन त्यांनी एकादशी असल्याने त्याच अनुषंगाने अभंग घेऊन एकादशी व्रतमहात्म्य व्रतवैकल्ल्याचे महात्म्य आणि या संतपरंपरेविषयी अतिशय मोलाचे मार्गदर्शन करत त्यात मातृत्वाचा आणि पितृत्वाचा यथोचित संबंध सांगून मातृ पितृत्व किती मौलिक आहे याच मार्गदर्शन केले.
दुसऱ्या दिवशी हभप भरत महाराज चौधरी यांचे कीर्तन संपन्न होत असताना मानवी जीवन जर आपल्याला सुखरूप स्थितीला प्राप्त करायचे असेल आणि संतानुमोदीत भूमिकेतून सफलता संपन्न करायचे असेल तर नाम साधना हे आपल्या जीवनात अनुसंधारात्मक स्थितीच्या माध्यमातून संपन्न केली पाहिजे. निश्चितपणाने कोणीही असू देत ज्ञानोत्तर भक्तीचाच अवलंबन करून नामसाधना हेच मोक्षापर्यंत नेणारे साधन आणि साध्य ही आहे असं सांगत आई-वडिलांचे महत्त्व त्यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून छान पद्धतीने अतिशय चपलख अशा शब्द भांडारातून महत्त्व पटवले.
या उत्सवाचा समारोप काल्याच्या कीर्तनाने हभप परमपूज्य पांडुरंग महाराज घुले यांच्या काल्याच्या इतनाने भगवान श्रीकृष्णाचा महत्त्व सांगत आणि भगवतप्राप्तीची उपलब्धी याच मानवी जीवनामध्ये होऊ शकते म्हणून आपण किती लक्ष देत दक्ष होऊन भगवत भक्ती करून भगवत प्राप्ती या विषयाचे अनुसंधारात्मक स्थितीचा अवलंब करणे आणि आपले जीवन कृतार्थ करणे हेच महत्त्व मानवी जीवनामध्ये आहे अशी खूप छान पद्धतीने मांडणी करत संपूर्ण उपस्थित समाजाला आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून उपक्रम केले .
सदर किर्तन महोत्सवात ग्रामपंचायतचे बिनविरोध नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच व सर्व सदस्य मंडळी त्यांचाही सन्मान याप्रसंगी करण्यात आला. या कार्यक्रमाला पंकज समूहाचे अध्यक्ष डॉ सुरेश बोरोले , भुविकास बँकेचे माजी विश्वस्त रामभाऊ अण्णा पाटील वाघळूदकर , हभप निंबा महाराज पाटील ,हभप आबासाहेब महाराज गोडसे , हभप भरत महाराज चौधरी ,हभप रामचंद्र महाराज सारंग, हभप विकास महाराज पाटील ,हभप जनार्दन महाराज पाटील, हभप संतोष महाराज मोहिते ,हभप रवींद्र महाराज कुमकर ,हभप वैभव महाराज गलधर ,हभप जगन भाऊ पाटील , हभप भानुदास चौधरी ,हभप कांतीलाल पाटील , गरताडकर , कुरवेलकर मंडळी व संपूर्ण गावाची मंडळी तसेच पंचक्रोशीतील मंडळी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
समारोपप्रसंगी संपूर्ण उपस्थित मंडळीला व गावकरी मंडळीला महाप्रसाद होऊन समारोप करण्यात आला . या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन अशोक अमृत चौधरी व धनराज अमृत चौधरी यांनी केले होते....