शेतकऱ्यांचे चेहऱ्यावर वाढणारे हास्य हीच बाजार समितीच्या कार्याची पावती..सभापती- नरेंद्र पाटील

शेतकऱ्यांचे चेहऱ्यावर वाढणारे हास्य हीच बाजार समितीच्या कार्याची पावती..सभापती- नरेंद्र पाटील

♦️हातचिट्ठीवर माल घेणे परिपूर्णपणे बंद

♦️अवघ्या पाच महिन्याचा कालावधीत ८५ लाख रुपयांचे उत्पन्न

♦️शेतकऱ्यांना तात्काळ पेमेंट अदा  करण्याची पद्धत सुरू 

♦️शेतकरी निवास स्थान शेतकऱ्यांसाठी सज्ज 

चोपडा,दि.३१ (प्रतिनिधी)-- चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याची आवक वाढली असून इतर अन्नधान्याची सुद्धा आवक वाढली आहे .अवघ्या  पाच महिन्यांत लाखोंचे उत्पन्न आमच्या संचालक मंडळ अभ्यासू सल्लागारांच्या मदतीने शक्य झाले आहे.ते आता कोटींच्या  घरात  पोहचेल  असा आत्मविश्वास  सभापती नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला आहे.

अधिक  माहिती देतांना त्यांनी स्पष्ट केले की, काही व्यापारी हातचिठ्ठीवर माल घेत होते त्यामुळे मापाडीचेंही आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते परंतु नवीन संचालक मंडळ आल्यापासून हातचिट्ठीवर माल घेणे  आम्ही  पूर्णपणे बंद केले . तसेच मालाचा तोल काटा झाला की  त्याच् दिवशी पैशांच्या चेक शेतकऱ्यांना मिळत असतो त्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला आहे हेच समाधान आम्हा संचालक मंडळाला मिळतं असून तीचं शेतकऱ्यांची खरी  सेवा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले .

शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी असेच सहकार्य केले तर अवघ्या पाच महिन्याचा कालावधीत ८५ लाख रुपयांचा उत्पन्न आपण घेतले आहे. तर आर्थिक वर्षाच्या शेवट पर्यंत आपण दुपटीने  उत्पन्न घेण्याचे मानस आहे आणि तो पूर्ण करणारच अशी ग्वाही त्यांनी पत्रकारांशी हितगुच करतांना दिली.

या अगोदर काही व्यापारी ठराविक शेतकऱ्यांना पंधरा पंधरा दिवस मालाचे पैसे देत नसल्याने हाच माल  शिरपूर अमळनेर व इतर ठिकाणी जात असल्याने आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तोटा होत होता. परंतु व्यापाऱ्यांना  त्यांच्याही अडीअडचणी समजून त्यांना सांगितले की  शेतकऱ्यांना तात्काळ पेमेंट अदा करा यात आपल्याच कृषी उत्पन्न बाजार समितीचा फायदा आहे हे त्यांना पटवून दिल्याने त्यांनी होकार दिला. व हात चिट्ठीवर कोणीही  माल घेऊ नका अशी विनंती त्यांना केली असता त्यातही त्यांनी सहकार्याची भूमिका दाखविल्याने ही आवक वाढली आहे तसेच प्रत्येक जिनिंग वर एक मापाडी आम्ही बसून दिले असल्याने एकही व्यापाऱ्याला हात चिठ्ठीवर माल मिळत नाही. ती फी पूर्णपने मिळत आहे. त्यामुळे मापाडीची  मजुरीही वाढली आहे. ती ही त्यांना मोठया प्रमाणावर मिळत असल्याने त्यांचा रोज चांगल्या पद्धतीने होत आहे. जवळपास ६००० क्विंटल आणि जिनिंग मध्ये जवळपास ३००० क्विंटल मक्याची आवक आहे. चांगल्या मालाला २००० रुपया पर्यंत भाव मिळत आहे. आणि ओला असला तर त्याला कमी भाव मिळत आहे त्यापेक्षा शेतकऱ्यांनी आपल्या घरीच मालाला कोरडा करून आणायला हवा जेणे करून २००० पेक्षाही जास्त भाव मिळतील. तसेच आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत नुकतेच शेतकरी निवास स्थान तयार करण्यात आले आहे. तरी त्यांचा ही लाभ शेतकरी बांधवांनी घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने