वन विभाग व क्रुषी विभागामार्फत वनराई बांध
चोपडा दि.२७(प्रतिनीधी) - यावल उपवनसंरक्षक जमीर शेख साहेब,तालुका क्रुषी अधिकारी दिपक साळुंखे,सहाय्यक उपवनसंरक्षक प्रथमेश हडपे व मंडळक्रुषी अधिकारी आर एम पाटिल यांच्या पाणी अाडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून व आर एफ ओ बी के थोरात,आर एफ ओ समाधान सोनवणे व वनपाल प्रशांत सोनवणे यांच्या प्रेरणेने चौगाव वनक्षेत्रात तिर्थक्षेत्र त्रिवेणी महादेव मंदिर परीसरातील नाल्यावर श्रमदानाने वनराई बांध बांधण्यात आला.या बांधांमुळे वनक्षेत्रातील प्राणी,पशु व पक्षांना पाण्याची सोय होईल तसेच परीसरातील पाण्याच्या पातळीत निश्चितच वाढ होईल.
या बांधाच्या निर्मितीसाठी क्रुषीसहाय्यीका शितल पाटिल,एस.पी.शिंदे राहूल साळुंखे,वनरक्षक अमोल पाटिल,कंखरे दादा,चौगावचे पोलिस पाटिल गोरक राजपूत,वनव्यवस्थापण समितीचे उपाध्यक्ष विश्राम तेले,महेंद्र राजपूत,वनमजूर रावसाहेब कोळी,विलास पवार यांनी श्रमदान केले.