आदिवासी टोकरे कोळी समाजाचे अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाची दखल घ्या ..चोपडा तहसीलदारांना निवेदन

 आदिवासी टोकरे कोळी समाजाचे अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाची दखल घ्या ..चोपडा तहसीलदारांना निवेदन

चोपडा दि.२७(प्रतिनिधी)तालुक्यातील कोळी समाज बांधव मागील 20 दिवसापासुन अन्नत्याग सत्याग्रहा‌ला बसलेले असुन त्यांची तब्यत दिवसेंदिवस तंबेत खालावली जात आहे तरि आपले सरकार त्यावर समाधान कारक तोडगा काढत नाही.त्यामुळे चोपड्यात समस्त कोळी समाज नाराज असुन भारतीय जनता पार्टी पक्षाशी एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते हे पक्षाच्या विरोधात जातील व पक्षांच्या पुढील कार्यक्रमावर बहिष्कार करणार असुन,आमची आपणास विनंती आहे की आपण आमच्या भावना प्रदेश अध्यक्ष  बावनकुळे व महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समोर मांडुन लवकर तोडगा काढण्यास सहकार्य करावे असे सांगण्यात आले.

जळगाव येथे उपोषणास गेल्या अठरा दिवसापासुन जगन्नाथ बाविस्कर अन्नत्याग सत्याग्रहास बसलेले आहे व त्यांची सद्या प्रकृती खालवली आहे.त्या उपोषणास चोपडा कोळी समाजाचा जाहीर पाठीबा देण्यात आला आहे उद्या धरणगांव नाक्यावर  दुपारी १.३० वाजेला रास्ता रोको होणार आहे असे कोळी समाजातील जेष्ठ पदाधिकारी व समाज बांधवाचे चोपडा तालुक्यातीला कोळी समाजाचे रस्ता रोको आंदोलनात उपस्थित राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे. सदर निवेदन हे तहसीलदार भाऊसाहेब थोरात व पोलीस निरीक्षक के के पाटील यांना देण्यात आलेले आहे. याप्रसंगी प्रकाश कोळी जिल्हाउपाध्यक्ष ,भरत कोळी,विजय कोळी,संदिप कोळी,वाल्मिक कोळी आदि समाज बांधव निवेदन देतांना उपस्थित होते.




Post a Comment

थोडे नवीन जरा जुने