खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत चोपड्यात भाजपाची विधानसभा “सुपर वॉरियर्स कार्यशाळा उत्साहात
चोपडादि.२७(प्रतिनिधी) : येथे रावेर लोकसभाअंतर्गत चोपडा विधानसभा भारतीय जनता पार्टीची “सुपर वॉरियर्स कार्यशाळा व पदाधिकारी बैठक”आज प्रदेश सरचिटणीस श्री.विजयजी चौधरीज्ञयांच्या प्रमुख मार्गदर्शनात तथा विभागीय संघटन मंत्री श्री. रविजी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष श्री.अमोल जावळे व खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
प्रमुख पदाधिकाऱ्यांसह खासदार श्रीमती रक्षाताई खडसे हयांनी बैठकीत उपस्थित चोपडा विधासभा क्षेत्र मधील सुपर वॉरियर्स व प्रमुख पदाधिकारी यांना आगामी निवडणुकांना समोर ठेवून बुथ सशक्तीकरण तसेच २१ कलमी करावयाची कार्य या संदर्भात मार्गदर्शन केले. पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून विधानसभा क्षेत्रातील स्थितीचा आढावा घेतला. तसेच सुपर वॉरियर्स यांना बुथ किट वाटप करण्यात आले.
यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह प्रदेश सरचिटणीस श्री.विजयजी चौधरी, विभागीय संघटन मंत्री श्री. रविजी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष श्री.अमोल जाळे, रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख श्री.नंदकिशोर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष श्री.अजय भोळे, जिल्हा सरचिटणीस श्री.सचिन पानपाटील, जिल्हा सरचिटणीस श्री.राकेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष श्री.अंबदास सिसोदिया, सौ.ज्योत्स्ना चौधरी, चोपडा विधानसभा क्षेत्र निवडणूक प्रमुख श्री.गोविंद सैंदाने, श्री.रोहित निकम, तालुकाध्यक्ष श्री.पंकज पाटील, शहराध्यक्ष श्री.गजेंद्र जैस्वाल, श्री.गजेंद्र सोनवणे, श्री.चंद्रशेखर पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष श्री.पंकज पाटील, श्री.मनोज सनेर, श्री.भरत सोनगिरे, श्री.पुरोजित चौधरी, सौ.कांचन फालक, श्री.जे.टी.पाटील सर, श्री.राकेश फेगडे, श्री.नरेंद्र पाटील यांच्यासह चोपडा विधानसभा प्रमुख भाजपा पदाधिकारी व सुपर वॉरियर्स उपस्थित होते.