जिल्हा आरोग्य विभागाकडुन "आंतरराष्ट्रीय हवामान कृतीदिन" साजरा
जळगांव..दि.२८(प्रतिनिधी).हवामान बदल हे सार्वजनीक आरोग्य आव्हानापैकी सध्या सर्वात मोठे एक आव्हान असुन, या हवामान बदल आणि त्यांचे आपल्या आरोग्यावर होणारे परिणाम, यांचे प्रभाव कमी करण्याच्या दृष्टीने वैयक्तिक आणि सामूहिक कृती महत्वपूर्ण आहे.जागतिक होणारे तापमानवाढ आटोक्यात ठेवण्यासाठी करावयाच्या कृतीचे, तसेच जागरूकता वाढविण्यासाठीच,या आजच्या आंतरराष्ट्रीय हवामान कृती दिनाची स्थापना करण्यात आली आहे.या हवामान कृतीदिन मोहिमे दरम्यान सर्व आरोग्य विभागांच्या माध्यमातून,समुदाय आणि वैयक्तिक पातळीवरील आरोग्य आणि हवामान कृतीबद्दल, जागरूकता पसरविण्याची अतिशय नितांत गरज असल्याने, NPCCHH आणि NCDC यांचे सयुक्तिक पणे कचरा व्यवस्थापन व कागदाचा जबाबदारीने वापर, ऊर्जेचा वापर हा कमी करणे, पाणी वाचविणे आणि सार्वजनिक वाहतुकीचा अधिक प्रमाणात वापर करणे, यावरील कृती ह्या ठळक पणे प्रदर्शित करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय कार्यक्रम हवामानातील बदल आणि मानवी आरोग्य (NPCCHH) या कार्यक्रमांतर्गत आंतरराष्ट्रीय हवामान कृतीदिन २०२३ हा दिनांक- २४ ऑक्टोबर २३ ते २८ ऑक्टोबर २०२३ दरम्यान हा सप्ताह जिल्ह्याभरात राबविण्यात येत आहे.
त्या अनुषंगानेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांचे हस्ते तथा कुष्ठरोग उपसंचालक-डॉ.जयवंत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली, हवामान कृती दिन अंतर्गत तयार करण्यात आलेल्या IEC पोस्टर्स वर, हवामान बदल, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व पाणी वाचविणे आदी विषयावर त्यांचे स्वाक्षरात, संदेश लिहण्यात आलेत, तसेच आरोग्य विभागातून, व जिल्हा परिषद मधील सर्व विभागातून अधिकारी व कर्मचारी हे देखील सहभागी झाले.
सदरच्या उपक्रमामध्ये जिल्हा आरोग्य अधिकरी डॉ.सचिन भायेकर, कुष्ठरोग उपसंचालक-डॉ जयवंत मोरे, जिल्हा साथरोग अधिकारि-डॉ. बाळासाहेब वाभळे, उप जिल्हा आरोग्य अधिकारी-डॉ.बिराजदार, डॉ.जैन, मुख्य कार्यालय प्रमुख-दिनेश झोपे, कांतीलाल पाटील, मनोज पाटील, जितेंद्र सोनवणे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख-विजय देशमुख, आरोग्य विस्तार अधिकारी-विजय विंचू, आरोग्य सहाय्यक-संतोष मोरे, जयंत पाटील, कनिष्ट सहाय्यक-राजेंद्र चौधरी, हेमंत पाटील, साकीब शेख, विजय अहिरे, किरण भोलाणे, श्री अत्रे, साथरोग अधिकारी-श्रीम.डॉ.सुधा चौधरी मॅडम,संजय सोनवणे, सांख्यिकी अधिकारी-मंचरे, श्रीम.भालेराव मॅडम, आदी सर्व विभागाचे अधिकारी व सर्व कर्मचऱ्यानी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.