वैयक्तिक व सामाजिक उन्नतीचा मार्ग आर्थिक सक्षरतेतून: प्राचार्य डॉ प्रकाश लोहार*

 *वैयक्तिक व सामाजिक उन्नतीचा मार्ग आर्थिक सक्षरतेतून: प्राचार्य डॉ प्रकाश लोहार

दोंडाईचा दि.२८(प्रतिनिधी)श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे श्रीमती पार्वतीबाई बाजीराव बागल कला व वाणिज्य महाविद्यालय दोंडाईचा अंतर्गत करिअर कट्टा विभाग यांच्या वतीने आज महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता आर्थिक साक्षरता कार्यशाळा आयोजित करण्यात आली. सदर कार्यशाळा भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता आर्थिक दृष्ट्या साक्षर व सुज्ञ करण्यासाठी ही कार्यशाळा महत्त्वाची ठरते. 

कार्यशाळेसाठी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबी चे प्रदीर्घ अनुभव असलेले प्रशिक्षक श्री रोहित कुमार हे प्रमुख मार्गद्शक होते व अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रकाश लोहार यांनी भूषवले

कार्यशाळेत विद्यार्थ्यांना सेन्सेक्स, नॅशनल स्टोक एक्सचेंज (एनएसई) सोबतच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी), सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन, आणि सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅन आशा संकल्पना माहीत झाल्यात, या संकल्पनांच्या माध्यमातून आपला पैसा काळजीपूर्वक योग्य ठिकाणी गुंतवणूक कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. 

आर्थिक साक्षरता कार्यशाळेच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ प्रकाश लोहार यांनी म्हंटले की आपला देश तरुणांचा म्हणून ओळखला जातो. वैयक्तिक उन्नती साधण्यासाठी शिक्षित व प्रशिक्षित होऊन उद्यमशील होणं काळाची गरज आहे. भविष्यात त्यातून होणाऱ्या आर्थिक उगमाची बचत व योग्य गुंतवणूक केल्यास सामाजिक समृद्धी साध्य करता येईल. आधुनिक युगात आर्थिक क्षेत्राचे डिजिटलायझेशन झालेले आहे त्यामुळे पैशांच्या व्यवहारात फसवणूकीपासून संरक्षण होण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर सजगतेने करणे गरजेचे आहे असे 

सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. उपस्थिती महत्त्वाची ठरते. आर्थिक साक्षरता कार्यशाळेत उपस्थितींचे आभार यादव बोयेवर मानले व राष्ट्रगीताने कार्यशाळा संपन्न झाली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने