चोपड्यात म.वाल्मिक जयंती साजरी अ.भा.साहित्य परिषदेचा उपक्रम

 चोपड्यात म.वाल्मिक जयंती साजरी अ.भा.साहित्य परिषदेचा उपक्रम


चोपडा दि.२८(प्रतिनिधी)- येथील भगिनी मंडळ संचलित माध्यमिक विद्यालयात आद्यकवी रामायणाचे रचिता महर्षी वाल्मिक जयंती आणि शरद पौर्णिमा यांच्या औचित्याने कार्यक्रम पार पडला.अध्यक्षस्थानी परिषदेचे तालुकाध्यक्ष अशोक सोमाणी होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून समाजकार्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा पीपल्स बॅकेचे संचालक डॅा.आशिष गुजराथी होते.यावेळी मान्यवरांचे हस्ते महर्षी वाल्मिक यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.कार्यक्रमात परिषदेच्या शाखेचे कार्याध्यक्ष गोविंद गुजराथी यांनी म.वाल्मिक यांच्याबद्दल माहिती प्रस्तुत केली.तसेच शरद पौर्णिमेचे महत्व पटवून सांगितले.

प्रास्ताविक व आभार प्रदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.डी.चौधरी यांनी केले.कार्यक्रमास साहित्य परिषदेचे जिल्हा कार्यकारणी सदस्य श्रीकांत नेवे,शाखा उपाध्यक्षा वैद्य प्राजक्ता महाले,सदस्या प्रिती सरवैय्या पाटील,विद्यालयाचे पर्यवेक्षक एस.बी.पाटील,साहित्यिक संजय बारी शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने