" मराठा समाजाला आरक्षण देवून घटनेचा व शपथेचा मुख्यमंत्र्यांनी सन्मान करावा... चोपडातील मराठा बांधवांच्या निवेदन
चोपडा दि.३०(प्रतिनिधी)शेतकऱ्यांना(कुणबी) लुटून सरकारांनी देशोधडीला लावले आता शिक्षणासाठी व पोटापाण्यासाठी आरक्षण मागण्याची पाळी त्यांच्यावर आणली,सारे कायदेशीर कागदपत्रे असून देखील त्यांना आरक्षण न देणे घटना विरोधी आहे.मा मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री सांगतात टिकणारे आरक्षण देवू , कित्येक वर्षे हाच खेळ सुरू आहे. आज मनोज जरांगे पाटील प्राणाची बाजी लावत लढत आहेत,कित्येक तरुणांनी समर्थनार्थ आत्महत्या केल्यात,पण राजकारण्यांना भावना नसाव्यात त्यांना प्रत्येक घटनेत राजकारण दिसत आहे. हे सारे थांबवून तात्काळ निर्णय घ्यावा,मराठा बांधव शांततेत आंदोलन करीत आहेत,कुणीतरी भडकाऊ लोक जाळपोळ करीत आहेत.संयमाने आंदोलने करणाऱ्यांचा सरकार ने अंत पाहू नये असे निवेदन तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना दिले.
यावेळी सारे समाज बांधव हे मनोज पाटील मागे उभा असून त्यांच्या तब्बेती साठी भगवंताला प्रार्थना केली. यावेळी ॲड संदीप पाटील,घनश्याम पाटील,राजेंद्र पाटील,सुरेश पाटील,एस बी पाटील,शशिकांत पाटील,शशिकांत देवरे,गिरीश पाटील,रमेश सोनवणे, प्रा प्रदीप पाटील,डॉ रवींद्र पाटील,डॉ रोहन पाटील, डॉ रवींद्र निकम,अजित पाटील,रणजित निकम,देविदास सोनवणे, ॲड कुलदीप पाटील,भगवान पाटील,भागवत पाटील,रमाकांत पाटील,तुकाराम पाटील,भटू पाटील,प्रमोद बोरसे, दिव्यांक सावंत,रत्नाकर बाविस्कर, ॲड चंद्रशेखर निकम,दिनेश बाविस्कर,संजय पाटील,आर एच बाविस्कर,भास्कर पाटील,मनोज निकम,मधुकर पाटील,धनंजय पाटील,संदीप बोरसे,सुनील देशमुख, ॲड एस डी पाटील,नितेश पाटील,एस टी पाटील,श्रीकांत पाटील, शशिकांत पाटील,सागर पाटील,सतीश बोरसे, निलेश पाटील,दिनेश पाटील,मनोज पाटील यांचेसह असंख्य समाज बांधव हजर होते.