स्वराज्य निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली तापी माई नदी पात्रात स्वच्छता

 

      स्वराज्य निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली तापी माई नदी पात्रात स्वच्छता 

 चोपडा दि.३०(प्रतिनिधी) :   दुर्गा शदेवी महोत्सवानिमित्त देवी माताचे मूर्ती विसर्जन तापी नदी पात्रात करण्यात आले मात्र यावेळी अनेक जण नदीपात्रात काहीही घाण टाकून घाणीचे साम्राज्य वाढवितात हे गांभीर्य ओळखून स्वराज्य निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पुढे येऊन स्वच्छता अभियान राबवून साफसफाई केली त्यांच्या या  सेवाभावी कार्याला अनेकांनी सलाम ठोकून कार्यकर्त्यांच्या पाठीवर  शाब्बासकीची थाप ठोकली आहे.

 तापी नदी पात्र निमगव्हाण ता. चोपडा येथे स्वराज्य निर्माण सेना ,चोपडा वतीने स्वछता अभियान राबवण्यात आले ,व तापी नदी पात्र सर्व्यानी स्वच्छ ठेवावे असे आवाहन भाविकांना केले त्यानुसार या सेवाभावी कार्यासाठी,स्वराज्य निर्माण सेनेचे ,हर्षल पाटील ,नयन कोळी,चेतन लोहार ,सिद्धेश कोळी ,कृष्णा मराठे ,भय्यू पाटील,सुरज राजपूत ,कुणाल रखमे,हर्षल पाटील , आदींनी मेहनत घेतली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने