दिल्ली येथे मिस वर्ल्ड अबोली कांबळे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव पारित : अभिजीत आपटे

 दिल्ली येथे मिस वर्ल्ड अबोली कांबळे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव पारित : अभिजीत आपटे


पुणे दि.२९(प्रतिनिधी): मिस वर्ल्ड अबोली ताई कांबळे आपले खुप खुप अभिनंदन! आपला आम्हाला सार्थ अभिमान आहे ! या शब्दात राजकीय रणनितीकार व राष्ट्रनिर्माण पार्टी चे राष्ट्रीय सल्लागार अभिजीत कौशिक आपटे यांनी मिस वर्ल्ड अबोली चे अभिनंदन केले तसेच दिल्ली येथील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्र निर्माण पार्टी दिल्ली प्रदेश चे वरिष्ठ पदाधिकारी  ऑनलाइन गूगल मीट वर मीटिंग मध्ये राष्ट्रीय कोषाध्यक्ष, श्री दानवीर जी, राष्ट्रीय संगठन सचिव श्री चंद्रमोली जी, राष्ट्रीय  राजनीतिक सलाहकार, श्री अभिजीत आपटे जी, (महाराष्ट्र से), दिल्ली प्रदेश महासचिव श्री यतीश जी, पूर्वी दिल्ली अध्यक्ष, श्री, संदीप चौधरी जी, दिल्ली मीडिया प्रभारी, श्री अनुज जी एवम दिल्ली प्रदेश चे वरिष्ठ नेता डॉ. उपहार जी यांनी भाग घेतला यावेळी कु.अबोली यांचा अभिनंदन प्रस्ताव पास झाला.

परभणी येथील आमची बहीण,डॅा. अनील कांबळे यांची सुपुत्री अबोली कांबळे हिने Miss Queen Of The World India 2023 स्पर्धा जिंकून त्यात प्रथम स्थान प्राप्त केले आहे आणि पुरस्काराची मानकरी झाली  आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर पुर्ण भारतातील आंबेडकरी समाजासाठी ही आनंदाची बातमी आहे ते म्हणाले.

 कु अबोली कांबळे यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. आरपीआय कोकण प्रदेश अध्यक्ष तुषार दादा कांबळे यांच्यासह मनोज काळसेकर, योगेश भागवतकर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे विकास कदम मोराळकर, महिला नेत्या अमृता भंडारी, आरपीआय पुणे शहर उपाध्यक्ष भारत चव्हाण,  यांनी अबोली यांना शुभेच्छा दिल्या. लवकरच दिल्ली येथे राष्ट्रनिर्माण चे राष्ट्रीय अध्यक्ष आयपीएस आनंद कुमार तसेच माजी खासदार विक्रम सिंह ठाकुर यांच्या हस्ते कु अबोली कांबळे यांचा सत्कार करण्यात येईल अशी घोषणा अभिजीत आपटे यांनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने