चोपडा तालुका शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाची सभा उत्साहात संपन्न
चोपडा,दि.२९(प्रतिनिधी) तालुका शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाची सभा महाराष्ट्र शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष राजेश जाधव यांचे अध्यक्षतेखाली चोपडा येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाली. याप्रसंगी चोपडा तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष तथा ग.स.सोसायटीचे संचालक मंगेशदादा भोईटे, चोपडा तालुका क्रीडा संयोजक राजेंद्र आल्हाट, चोपडा तालुका क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष अशोक साळुंखे, क्रीडाशिक्षक महासंघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत कोल्हे, जिल्हा संघटक प्रा ईकबाल मिर्झा, क्रीडाशिक्षक महासंघाचे सहसचिव देविदास महाजन, अनिल माकडे, यावल तालुका क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष मुख्याध्यापक के यु पाटील, धरणगाव तालुका क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष के एस पाटील सचिव सचिन सूर्यवंशी, एरंडोल तालुका क्रीडाशिक्षक महासंघाचे सचिव सचिन महाजन, जळगाव जिल्हा युवा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ रणजित पाटील, चोपडा तालुका युवा महासंघाचे अध्यक्ष प्रा अमोल पाटील, निलेश पाटील, गिरीश महाजन, विजय विसपुते, रोहिदास महाले, हेमंत माळी, प्रा जितेंद्र ओस्तवाल यांची उपस्थिती होती. प्रारंभी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण जेष्ठ संघटक प्रा ईक्बाल मिर्झा यांनी केले सभेच्या आधी धरणगाव येथील स्वर्गीय क्रीडाशिक्षक मनोज परदेशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली प्रशांत कोल्हे यांनी क्रीडाशिक्षक महासंघाची रुपरेषा व कार्यप्रणाली, संच मान्यता,पवित्र पोर्टलमध्ये क्रीडाशिक्षक पदाचा सहभाग, क्रीडागुण सवलत याविषयावर मार्गदर्शन केले अध्यक्षीय मनोगतात राजेश जाधव यांनी क्रीडाशिक्षक महासंघ स्थापना, पवित्र पोर्टल,संच मान्यता, महिला क्रीडाशिक्षक सन्मान, क्रीडाशिक्षक मुख्याध्यापक सन्मान, आश्रमशाळेत क्रीडाशिक्षक नियुक्ती, क्रीडाशिक्षक यांचे कार्य व त्यासमोरील आव्हाणे, शारीरिक शिक्षण प्रात्यक्षिक गुणदान योजना, क्रीडा स्पर्धा आयोजन दर्जा व स्पर्धा अनुदान, क्रीडाशिक्षक पुरस्कार, शासनाचे धोरण या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले याप्रसंगी लोकमतच्या एक्सलंट पुरस्काराने मंगेशदादा यांना सन्मानित केल्याबद्दल जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघातर्फे सत्कार करण्यात आला तसेच उपस्थितांचे वतीने राजेश जाधव सर यांचा वाढदिवस ॲथलेटिक्स मैदानाचा आराखड्याचा केक बनवून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. जिल्हा शारिरीक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे सहसचिव देविदास महाजन यांनी चोपडा तालुका शारिरीक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाची नवनियुक्त कार्यकारिणीची निवड उपस्थितांच्या मंजूरी ने जाहीर केली. यात अध्यक्षपदी अशोक साळुंके, उपाध्यक्षपदी एस पी बाविस्कर, जे व्हि महाजन, सचिव जगदीश जाधव, सहसचिव आर टी पाटील, नरेंद्र महाजन, सल्लागार गुणवंत वाघ, साहेबराव पाटील, महिला सदस्या अनिता पाटील, पुजा चौधरी, सदस्य म्हणून विजय पाटील, आर एम मोरे, आर एस बडगुजर, भुपेंद्र पाटील यांची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेशदादा भोईटे यांनी प्रास्ताविक राजेंद्र आल्हाट यांनी तर आभार प्रदर्शन नवनियुक्त अध्यक्ष अशोक साळुंखे यांनी केले. सभेस तालुक्यातील सर्व क्रीडाशिक्षक बंधू भगिनी यांची उपस्थिती होती.