सत्रासेन आश्रमशाळेत एकलव्य क्रीडा महोत्सवास प्रारंभ

सत्रासेन आश्रमशाळेत एकलव्य क्रीडा महोत्सवास प्रारंभ 

चोपडा दि.२९(प्रतिनिधी) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल आयोजित प्रकल्पस्तरीय "एकलव्य क्रीडास्पर्धा" दिनांक २९ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत धनाजी नाना चौधरी आदिवासी सेवा मंडळ सत्रासेन येथे पार पडत आहेत.

एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय यावल येथील प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी सदर स्पर्धांचे आयोजन केले आहे.यावेळी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय नंदुरबार येथील प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय धुळे येथील प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष रवींद्र भादले सचिव ज्ञानेश्वर भादले,संस्थेचे उपाध्यक्ष धनंजय भादले व संचालक मंडळ यावेळी उपस्थित होते.प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या खेळाडू कडून क्रीडा मशाल पेटवण्यात आली.क्रीडा ध्वज फडकवित क्रीडा संचलन,प्रत्येक बिटचा ध्वज उंचवत मंचावरील पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली.आदिवासी पारंपारिक गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम,खेळाडू प्रतिज्ञा यावेळी सादर करण्यात आली.राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू निर्माण व्हावेत, संघ भावना वाढीस लागावी असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत पवार यांनी यावेळी बोलून दाखविली.प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी केले.पटांगणावर सहभागी खेळाडूंच्या परिचय,पंचांशी हितगुज करत प्रत्यक्ष नाणेफेक करून उपस्थित मान्यवरांनी सामना सुरू केला.एकूण चार बीटचे १२११ खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे.सर्व खेळाडूंची भोजन,निवास व्यवस्था संस्थेचे अध्यक्ष रवींद्र भादले यांनी उत्तमरीत्या सांभाळल्याची कबुली प्रकल्पाधिकारी यांनी दिली. सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशासन पी.व्ही.माहुरे यावेळी उपस्थित होते.तसेच समित्यांचे सूक्ष्म नियोजन सहाय्यक प्रकल्पाधिकारी पवन पाटील यांनी केले.विविध समित्यांनी आपापले कामकाज उत्तमरीत्या सांभाळले.कार्यक्रमाचे संचलन प्रमोद पाटील यांनी तर आभार भालचंद्र पवार यांनी केले.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने