*मौजे चहार्डी (चोपडा) येथे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत, “मेरी माटी मेरा देश” अभियान *
======================
चोपडा दि.२६(प्रतिनिधी)तालुक्यातील आज *मौजे चहार्डी (चोपडा)* येथे *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी भेट देऊन *“स्वातंत्राचा अमृत महोत्सव”* अंतर्गत स्वतंत्रता सैनानी आणि भारत मातेच्या वीर सपुतांचा सन्मान करण्यासाठी *प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी* यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या *“मेरी माटी मेरा देश”* मिट्टी को नमन, वीरो को वंदन हे अभियान राबवून, गांवातील माती *“अमृत कलश”* मध्ये संकलित करण्यात आली.
तसेच स्थानिक भाजपा कार्यकर्ते व ग्रामस्थांशी *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे व चोपडा विधानसभा निवडणुक प्रमुख श्री.गोविंद सैंदाणे* यांनी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. तसेच *७८२००७८२०० व ९०९०९०२०२४* मोबाईल क्रमांकावर मिस कॉल देऊन *प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी* यांना पाठींबा देण्यात येऊन *सरल अॅप* डाऊनलोड करण्यात येऊन, मार्गदर्शन करण्यात आले.
चहार्डी येथील सांस्कृतिक गणेश मंडळांना देखील *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी भेट दिली भेटीदरम्यान आरती करून गणेश मंडळांना ट्राॅफी व सम्मान पत्र देऊन ताईच्या हस्ते सत्कार करण्यात...*
*चहार्डी येथील भाजपाचे जेष्ठ नेते जे टी पाटील यांच्या घरी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सदिच्छा भेट दिली*
तसेच अंकलेश्वर बरानपुर रस्त्यावर व सातपुडा पर्वतरांगेतील देवझिरी येथे सर्रास पणे वृक्षतोड सरू आहे असे *चोपड्यात भाजप कार्याक्रत्यांनी खासदार ताईच्या लक्ष्यात आणुन दिले असता ताईंनी* क्षणाचाही विलंब न करता वृक्षतोड विषयावर *वन मंत्री सुधीर जी मुनगंटीवार यांच्या शी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला वन मंत्री सुधीर मुनगंटीवार साहेब यांनी सांगितल की या विषयावर मी सविस्तर विचारणा करतो व जो कोणी दोषी असेल त्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले..*
व चोपडा शहरातील पाचव्या दिवशी गणपती विसर्जन मिरवणूक अतिशय शांततेत पार पडली कुठेही गाल बोट न लागता मिरवणूक शांततेत पार पडली तरी *चोपडा शहराचे पी एस आय के के पाटील यांनी ३३ गणेश मंडळांवर गुन्हा दाखल केलेला आहे* असेही भाजप पदअधिकारांनी खासदारांच्या लक्ष्यात आणुन दिले *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी चोपडा शहरातील पी एस आय के के पाटील व एस पी साहेब यांना गणेश भक्तावर गुन्हे का दाखल केलेत यांची विचारणा केली असता* चोपडा तालुक्यात अनेक बेकायदेशीर गोष्टी घडत असतांना त्यावर तुमचे दुर्लक्ष आहे आणी विनाकारण गणेश भक्तांना त्रास देण्याचे काम तुम्ही करत आहात का असा प्रश्न खासदार रक्षाताई खडसे यांनी पी एस आय के के पाटील यांना केला..
तसेच चोपडा शहरातील भाजप कार्यालयाला *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी भेट दिली*
व भाजप कार्यालयातील *पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी साहेब यांच्या बालपण ते पंतप्रधान पदाच्या ९ वर्षाच्या कामाचा आढावा चित्रफित प्रदर्शनी द्वारे केले त्याची पहानी केली* व कार्यक्रते पदाधिकार्यांकडून चोपडा तालुक्यातील समस्या जाणून घेतल्या...
यावेळी *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे*
*माजी सभापती आत्माराम माळके*
*चोपडा विधानसभा निवडणुक प्रमुख श्री.गोविंद सैंदाणे*, *भाजपा तालुकाध्यक्ष श्री.पंकज पाटील*, *शहराध्यक्ष श्री.गजेंद्र जैस्वाल*, *भाजयुमो तालुकाध्यक्ष श्री.प्रकाश पाटील*, *बाजार समिती संचालक श्री.मनोज(विक्की) सनेर*, *श्री.भरत सोनगिरे, श्री.पंकज पाटील*, *जितेंद्रपाटील,*जिवन पाटील धर्मदास पाटील*श्री.दत्तात्रय पाटील*, *श्री.पिंटू पाटील*, *श्री.सवलाल पाटील*, *श्री.वैभव पाटील*, *श्री.गोलू पाटील*, *श्री.धनराज धनगर*, *श्री.ज्ञानेश्वर कांखरे*, *श्री.अरुण धनगर*, *श्री.भीमराव पाटील*, *श्री.योगेश महाजन*, *श्री.दुर्योधन ठाकरे, श्री.धनंजय* *सुरवे, श्री.गणेश पाटील या सह भारतीय जनता पार्टी चे असंख्य कार्यकर्ते उपस्थित* *होते*.