क्षयमुक्त ग्रामपंचायत साठी अडावदच्या ग्रामसभेत जनजागृती
चोपडा दि.३(प्रतिनिधी)अडावद गावाची क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत या केंद्र सरकारच्या उपक्रमात निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत शासनाच्या क्षयरोग मुक्त गाव या संकल्पने विषयी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन व माहिती देण्यात आली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर व जिल्हा क्षयरोग अधिकारी-डॉ.देवेंद्र जायभाये यांचे आदेशाने तथा तालुका आरोग्य अधिकारी-डॉ. प्रदीप लासुरकर आणि तालुका वरिष्ठ क्षयरोग तपासणी पर्येंवेक्षक-प्रमोद पाटील,क्षयरोग प्रयोगशाळा पर्येंवेक्षक-किशोर सेंदाणे, राजेंद्र पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली व देखरेखीत तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी, सर्व गट प्रवर्तक, सर्व आशा सेविका, हे संपूर्ण तालुक्यात क्षयरोग कार्यक्रमा विषयी ग्रामीण तथा शहरी भागातील शाळा, महाविद्यालयात, ग्रामपंचायत स्तरावरून प्रत्येक ठिकाणी जाऊन जनजागृती करण्यात येऊन, हा उपक्रम राबविन्यात येणार आहे.
प्रसंगी निवड झालेल्या गावांतील ग्रामसभेत ग्रामस्थांना केंद्र सरकारचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश व इतर सविस्तरपणे माहिती तथा मार्गदर्शन देताना,वैद्यकीय अधिकारी डॉ.अर्चना पाटील वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक चोपडा-किशोर सैंदाणे, आरोग्य सहाय्यक-विजय देशमुख ,सभेस प्रयोगशाळा तंत्रज्ञ-गणेश महाजन, प्रशासक-आर टी सैंदाणे, ग्रामविकास अधिकारी-पी.डी.सैंदाणे, हनुमंतराव महाजन, जावेदखा मेंबर,सचीन माळी,अमिर्जा मेंबर, पी आर माळी, प्रेमराज पवार, जितेंद्र शिंपी, नरेंद्र खांबायत, आर टी मोरे सर, मनोहर देशमुख, महेश गायकवाड, तथा सर्व आजी माजी सरपंच, उपसरपंच व सदस्य व ग्रामस्थ, सर्व पत्रकार बंधु देखील उपस्थित होते.