*मराठा आंदोलकांवर केलेला अमानुष लाठीमार प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा- आम आदमी पार्टी नाशिकची मागणी
नाशिक दि.३(प्रतिनिधी)जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक उपोषण करत होते. मात्र आंदोलकांना उपोषणासाठी विरोध करत पोलिसांनी आक्रमक होत आंदोलकांवर तीव्र लाठीचार केला त्यानंतर पोलिसांनी हवेत गोळीबार केला, मराठा उपोषण आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाई विरोधात राज्यभरात आम आदमी पार्टीकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सराटी गावामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु होतं असताना आंदोलकांच्या मंडपात पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्यामुळे महिला, लहान मुले मोठ्या संखेने जखमी झाले आहेत, जालन्यातील आंदोलन अमानुष पद्धतीनं मोडून काढण्याच्या राज्य सरकारच्या कृतीचा आम आदमी पार्टी तीव्र निषेध करत मराठा आरक्षण प्रकरणी सरकारनं समाजाचा अंत पाहू नये असा ईशारा आप नासिककडून देण्यात आला आहे. ह्याचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी उप तथा दंडाधिकारी राजेंद्र वाघ यांना देण्यात आले आहे.
*आम आदमी पार्टीच्या मागण्या:-*
1) निरपराध मराठ्यांवर अत्याचाराचे आदेश देणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.
२) अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर कायदेशीर कारवाई करावी.
३) जखमीं झालेल्या आंदोलकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ नुकसान भरपाई द्यावी.
४) पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना निलंबीत करावे.
चंदन पवार (राज्य मीडिया प्रमुख):-*
गृहखात्याकडून केलेली कार्यवाही ही अतिरेकी स्वरूपाची भूमिका आहे, संविधानिक आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाला नेहमीच भाजपा सरकारने सापत्न वागणूक दिलेली आहे.
*योगेश कापसे(पूर्व विधानसभा अध्यक्ष):-*
या सरकारने संविधानिक मार्गाने केलेले आंदोलन चिरडले आहेत यातून तीन तिघाडी सरकार मराठा विरोधी आहेत हे सिद्ध होते.
*गिरीष उगले पाटील(देवळली विधानसभा अध्यक्ष):-*
आम आदमी पार्टी कधीही जातीचे राजकारण करीत नाही, परंतु भाजपा सरकारने नेहमीच जातीचे राजकारण केलेले आहे, त्यांनी महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी प्रश्न तेवत ठेवला आहे.
ह्यावेळी आम आदमी पार्टीचे राज्य पदाधिकारी चंदन पवार, नाशिकचे पदाधिकारी गिरीश उगले पाटील, योगेश कापसे, दिपक सरोदे, सुमित शर्मा, गोरख मोहिते, अमोल लांडगे, अल्ताफ शेख, पद्माकर अहिरे, अमित यादव ईत्यादी उपस्थित होते