प्रताप विद्या मंदिराचे राज्यस्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
चोपडा,दि.२३(प्रतिनिधी) : एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिराने राज्यस्तरीय स्पर्धेत यश संपादन करून चोपडा नगरीच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला आहे. दि 21संप्टेंबर ला स्व. बाबासाहेब के नारखेडे स्मृती प्रित्यर्थ राज्यस्तरीय वकृत्व, गीत गायन व निबंध स्पर्धा भुसावळ येथील के नारखेडे येथे संपन्न झाल्यात.
यात प्रताप विद्यामंदिराने आपले विविध स्पर्धेतील वर्चस्व कायम टिकवून विजयी यशाची पताका फडकावून घवघवीत यश संपादन केले. सदर स्पर्धेतील गट क्रमांक 2 (7 वी/8वी) वकृत्व स्पर्धेत इ. 8वी ची विद्यार्थिनी कु . मुग्धा विजय याज्ञिक हिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सदर स्पर्धेतील गट क्रमांक 3 (इ 9 वी/10वी) यातील उत्स्फूर्त वकृत्व स्पर्धेत इ. 10 वीची विद्यार्थिनी दिव्या गजानन पाटील हिने राज्यस्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त करून नेत्रदीपक यश संपादन केले आहे. गट क्रमांक 4 ( 11वी12वी) मधील वकृत्व स्पर्धेत 11वीची विद्यार्थिनी रोशनी देविदास पाटील हिने राज्यस्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त केला. याच गट क्रमांक 4 ( 11वी/12वी) मधील उत्स्फूर्त वकृत्व स्पर्धेत 12वीची विद्यार्थिनी सायना कायम पठाण हिने राज्यस्तरीय द्वितीय तसेच सुगम संगीत गायन स्पर्धेत गट क्रमांक 2( 9वी /10वी) मधील गटात घनश्याम रवींद्र कोळी हा 9वी चा विद्यार्थी राज्यस्तरातून प्रथम आला आहे.
तसेच राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत गट क्रमांक 2 ( 7वी/8वी) यामध्ये स्पर्श डीगंबर पाटील या 7वीच्या विद्यार्थ्याने राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. गट क्रमांक 4 (11वी/12वी) मध्ये भूमिका नंदलाल तांबट 11वी ची सायन्स ची विद्यार्थिनी हिने राज्यस्तरीय तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे . या विद्यार्थ्यांना श्री व्ही ए गोसावी व पी बी कोळी आदींनी मार्गदर्शन केले.
सदर यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सौ शैलाबेन मयूर, उपाध्यक्ष विश्वनाथ अग्रवाल, चेअरमन राजा मयूर, सचिव माधुरी मयूर , संचालक चंद्रहास गुजराथी, भूपेंद्र गुजराथी, रमेश जैन, प्रशालेचे मुख्याध्यापक पी एस गुजराथी, उपमुख्याध्यापक एस जी डोंगरे, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य जे एस शेलार, पर्यवेक्षिका माधुरी पाटील, पर्यवेक्षक एस एस पाटील, पी डी पाटील , संस्थेने समन्वयक गोविंद गुजराथी , सर्व शिक्षक बंधू भगिनीनी आदींनी अभिनंदन व कौतुक केले आहे.