माउंट आबू येथे आजपासून पाच दिवसीय राष्ट्रीय मीडिया कॉन्फरन्स सुरू .. ऍड.बाळकृष्ण पाटील यांची माहिती
माउंट आबू (राजस्थान).....परिषदेच्या शुभारंभ प्रसंगी मत मांडतांना बी के निकुंजजी
माउंट आबू (राजस्थान)ता 8: माउंट आबू(राजस्थान)येथे आज पासून पाच दिवशीय राष्ट्रीय मीडिया कॉन्फरन्स सुरू झाली. 12 सप्टेंबर 2023 पर्यंत चालणाऱ्या या परिषदेचे आयोजन प्रजापिता ब्रह्मकुमारीज च्या मीडिया विंग कडून करण्यात आले आहे. या परिषदेतील परिसंवादात वैश्विक शांती व सद्भावसाठी सशक्त मीडिया या थीम वर भारतातील नामवंत पत्रकार व मीडिया कर्मचारी मत मांडतील.व विविध विषयांवर देश विदेशातील अनुभवी मत मांडतील.सोशल मीडियाचा समाज,जनमानसावर होणारा परिणाम यावरही या परिषदेत मंथन होईल.या कॉन्फरन्स साठी भारत व नेपाळ मधील प्रिंट व लाईव्ह मीडियातील सुमारे दोन हजार प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

