भाजप जिल्हाध्यक्ष अमोल जावळेंचा चोपडा तालुका दौरा,कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

 भाजप जिल्हाध्यक्ष अमोल जावळेंचा चोपडा तालुका दौरा,कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

चोपडा,दि.१०(प्रतिनिधी )- भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष  अमोल जावळे यांनी चोपडा तालुका दौ-यावर असताना वेगवेगळ्या जिल्हा परिषद गटां मधील गावांना भेटी दिल्या. सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचे कार्यालयास व वार रुमला भेट दिली.तसेच ग्रामीण भागात वेले आखतवाडे, चहार्डी,  अकुलखेडे, चुंचाळे, लासुर,  हातेड ह्या गावातील बुथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, जेष्ठ श्रेष्ठ आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते व प्रभावशाली व्यक्तींशी संवाद साधून बुथ प्रमुख हा भारतीय जनता पार्टी चा आत्मा आहे अशी जाणिव करुन दिली. 

"अपना बुथ सबसे मजबूत"  असेल तरच  विजय हा मजबूतीन होऊ शकतो असे अमोल जावळे यांनी बुथ प्रमुखांना सुचित केले. याभेटीत सर्वांशी अगदी सहजपणे बोलणे, प्रत्येक कार्यकर्त्याला मानसन्मानाने देत त्यांच्या समस्या जाणून घेत असताना अगदी स्व. हरिभाऊ जावळे ह्यांची आठवण करवून देत. आपल्याला भेटायला आलेल्या सामान्य नागरिकांच्या समस्याचे तालुक्यातील विविध प्रश्नांचे तालुका अध्यक्ष पंकज पाटील यांनी जिल्हाध्यक्षांना नागरिकाचे व कार्यकर्ते प्रश्नाचे संबंधित वेगवेगळ्या विषयांचे समस्यांची मांडणी वीज प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न, सन्मान निधी , पाटबंधारे विषयी, गावांमधील विविध समस्या संबंधित प्रश्नांचे अधिकारी वर्गाशी संपर्क करुन सोडविण्याचा प्रयास केला.सोबतच

विविध गावातील आध्यात्मिक व धार्मिक स्थळांना पण भेटी दिल्या.

  

यावेळी तालुकाध्यक्ष पंकज पाटील,शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल,विधानसभा निवडणूक प्रमुख गोविंद सैदाणे,जेष्ठ नेते चंद्रशेखर पाटील,प्रदीप पाटील,राजेंद्र सोनवणे,रवींद्र पवार, माजी जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे,युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस नरेंद्र पाटील,कृउबा संचालक मनोज सनेर,अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष मगन बाविस्कर,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील,जितेंद्र चौधरी, दत्तात्रय पाटील, योगेश महाजन, नंदलाल धनगर, भरत सोनगिरे,विजय बाविस्कर, मिलिंद वाणी,सागर सोनवणे,लक्ष्मण पाटील, शरद महाजन ,दिनेश जाधव, रविंद्र पाटील, धर्मदास पाटील, राकेश वाघ,मनोहर बडगुजर, हनुमंत महाजन, चंद्रकांत धनगर, बापुराव पाटील,अनिल बोरसे,अंबादास सिसोदिया, विकास पाटील, सतीश पाटील, कल्पेश सनेर, कुंदन सोनवणे, नाना पाटील, सुनील देशमुख, बळीराम बारेला, तुषार वाघतालुका महिला आघाडी प्रमुख जोत्सना चौधरी, शक्ती केंद्रप्रमुख भारती क्षिरसागर यांचेसह कार्यकर्ते, बूथ प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने