पाचोरा तालुका डॉक्टर असोसिएशनची नवीन कार्यकारणी जाहीर
*पाचोरा दि.११ (प्रतिनिधी राजेंद्र खैरनार )पाचोरा डॉक्टर असोसिएशन तर्फे अद्भुत शांतता व निखळ आनंद देणारा प्रेरणादायी कार्यक्रम "लव यू जिंदगी" अर्थपूर्ण जीवनासाठी "हृदय संवाद" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर पाचोरा डॉक्टर असोसिएशन बैठक घेऊन नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नवीन कार्यकारणी मध्ये डाॅ.भरत पाटील हे चेअरमन तसेच डॉ.अतुल पाटील यांची अध्यक्ष म्हणून तर डॉ. प्रवीण माळी सर यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.*
*तसेच नवीन कार्यकारणीत डॉ. राहुल काटकर खजिनदार, डॉ. हर्षल देव सचिव, डॉक्टर संकेत विसपुते सहसचिव, डॉक्टर बन्सीलाल जैन व डॉ.राहुल झेरवाल प्रसिद्धी प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. तसेच सांस्कृतिक विभागाची जबाबदारी डॉ.वीरेंद्र पाटील व डॉ.योगेश इंगळे तसेच स्पोर्ट्स विभागाची जबाबदारी डॉ.तौसिफ पठाण सर व डॉ. सिद्धांत तेली यांच्याकडे देण्यात आली. सदर कार्यकारिणीची निवड शांततेत खेळीमेळीच्या वातावरणात व बिनविरोध करण्यात आली*
