जिल्हाधिकारी गौरव साळुंखे यांची फोटोग्राफी दिनी भेट
चोपडादि.२२( प्रतिनिधी) चोपडे शहरातील शिव कॉलनी भागातील रहिवासी आर एस साळुंखे यांचे चिरंजीव नवनिर्वाचित जिल्हाधिकारी गौरव साळुंखे यांनी जागतिक फोटोग्राफी दिनी तारीख 19 रोजी हरेश्वर मंदिरावर आयोजित कार्यक्रमाला सदिच्छा भेट दिली व फोटोग्राफर बांधवांना शुभेच्छा दिल्या.
जिल्हाधिकारी गौरव साळुंखे यांचे स्वागत चोपडा फोटोग्राफर असोसिएशन तफॅ संचालक छोटू वारडे ज्येष्ठ पत्रकार कवी लेखक साहित्यिक रमेशजे.पाटील यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केला यावेळी त्यांच्या समवेत आर एस साळुंखे सर फोटोग्राफर अरूण कोळी, विनोद मोरे ,खोकर क्रिएशन चे संचालक अजहर तेली आदि. सहकारी हजर होते. गौरव साळुंखे हेभरतपुर(राजस्थान) येथे या पदावर कार्यरत आहेत . त्यांनी दिलेल्या सदिच्छा भेटीमुळे आपण भारावून गेलो अशा शब्दात सुशांक स्टुडिओचे संचालक छोटूभाऊ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.