आम आदमी पार्टीकडून समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
नाशिक दि.१(प्रतिनिधी ):संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे शिलेदार कष्टकरी मजुरांची लढाई लढणारे, रशिया सारख्या देशात जाऊन भारताचे नाव लौकिक वाढवणारे समग्र क्रांतीचे स्वप्न घेऊन चळवळ चालवणारे दीड दिवस शाळा शिकून 35 कादंबऱ्या तीन प्रवास वर्णन साथहून अधिक नाटके एवढा मोठा लिखाण प्रपंच मराठी साहित्य क्षेत्रातील साहित्य सम्राट महाराष्ट्रासाठी भूमिगत होऊन डफ हाती घेऊन आपल्या शाहिरीतून समाज प्रबोधन करणारे आपल्या लिखाणातून वंचित घटकात राहणाऱ्या नायक व नायिका व्यवस्थेची कशा प्रकारे लढतात त्या लढण्यातून अनेक सत्य घटना मांडणारे प्रबोधनकार लेखक कवी अशा एक ना अनेक भूमिका साकारणारे कॉम्रेड लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती आज आम आदमी पार्टी नासिककडून साजरी करण्यात आली आहे.
ह्या प्रसंगी राज्य मीडिया प्रमुख चंदन पवार पदाधिकारी योगेश कापसे, गिरीश उगले पाटील, दीपक सरोदे अभिजीत गोसावी, प्रदीप लोखंडे, विलास मोरे, प्रकाश कनोजे, अल्ताफ शेख ईत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.