फोटोग्राफरांच्या कलेने होते आपल्या पूर्वजांचे स्मरण : माजी आ. कैलास पाटील
चोपडा,दि.२१( प्रतिनिधी) समाजाला पिढीजात फोटोग्राफर मुळे फोटोचे स्मरण होते आपले पूर्वज कसे होते हे दाखवण्याची तजवीज फोटोग्राफर करून ठेवतात म्हणून फोटोग्राफर हा घटक तेवढाच महत्वपूर्ण आहे असे प्रतिपादन जागतिक फोटोग्राफी दिनाच्या निमित्ताने माजी आमदार कैलास पाटील यांनी येथे केले.
19 ऑगस्ट जागतिक फोटोग्राफी दिन हरेश्वर मंदिर चोपडा येथे उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला यावेळी फोटोग्राफर असोसिएशन द्वारा आयोजित कार्यक्रमात बोलताना ते बोलत होते.फोटोग्राफर बंधू आज उत्कृष्ट पत्रकार होऊ शकतो म्हणून ही कला जतन करण्याची जबाबदारी फोटोग्राफर बंधूंवर आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रांताधिकारी एकनाथ बंगाळे, पत्रकार प्रवीण पाटील ,आर्केस्ट्रा कलावंत पंकज पाटील, पोलीस निरीक्षक के .के पाटील आदीं मान्यवर उपस्थित होते.
दिव्यांग बांधवांना मदतीचा हात
चोपडा तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या तर्फे अकुल खेड्यातील दिव्यांग सोनल आधार मिस्त्री गणेश आधार मिस्त्री व रामचंद्र भाऊ अपंग फोटोग्राफर यांना कपडे व शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले प्रांताधिकारी बंगाळे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात व माजी आमदार कैलास पाटील यांनी त्यांना या कार्यक्रमात गौरविले.तापी सहकारी सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन प्रल्हाद रघुनाथ पाटील ,उद्योजक विश्वनाथ अग्रवाल,ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत पाटील चहार्डी, ज्येष्ठ फोटोग्राफर प्रकाश भाऊ राजपूत यांचाही गौरव झाला.
दीप प्रज्वलानंतर मान्यवर अतिथींचा सत्कार सुशांत डिजिटल चे संचालकछोटू वारडे, पटेल फोटो स्टुडिओ चे संचालक राजेंद्र पाटील कोकर क्रिएशनचे अजहर तेली आदींनी केला प्रास्ताविक कवी लेखक तथा साहित्यिक रमेश पाटील यांनी केले यावेळी विनोदमोरे, मुजम्मिल ,भाई जावेद शेख, योगेश राजपूत प्रकाश राजपूत भूषण कोळी प्रशांत चांदे, भिकन बनसोडे टिनू सोनवणे योगेश बैरागी ,शाहरुख खान, युनुज भाई हेमकांत देवराज अनिल महाजन प्रकाश चित्ते अभिजीत खजुरे दर्शन सोनार प्रकाश पवार आडगावकर आदी मान्यवर फोटोग्राफर व पत्रकार बंधू उपस्थित होते. सवाॅचे आभार छोटूभाऊ वारडे यांनी मानले