न्यू पार्वती नगरात वृक्षारोपण व निर्माल्य रथाचे लोकार्पण.. महापौर जयश्री महाजन यांच्या शुभहस्ते


 

न्यू पार्वती नगरात वृक्षारोपण व निर्माल्य रथाचे लोकार्पण.. महापौर जयश्री महाजन यांच्या शुभहस्ते 

जळगाव दि.२१(प्रतिनिधी) :* महानगरातील पार्वती नगर भागातील "शिवानंद महादेव मंदीर परिसरात  महापौर जयश्री महाजन यांच्या शुभहस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. याचवेळी निर्माल्य रथास प्रारंभ करण्यात आला आहे.
देशाच्या स्वातंत्र्याला ७५वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत देविदासभाऊ फुलपागारे यांनी पुढाकार घेत वृक्षारोपणाचा विषय मांडला असता सर्वानुमते श्रावण महिन्याच्या पहिल्या रविवाररोजी शुभ पर्वावर शिवानंद महादेव मंदिर परिसरात  वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी
महापौर सौ.जयश्रीताई महाजन  ,माजी महापौर सौ.भोळे मामी,माजी नगरसेविका सौ.लक्ष्मीबाई बाविस्कर,कु.पद्मलक्ष्मी  अजयराजे बाविस्कर डॉ.अर्जुनदादा भंगाळे ,श्री.प्रल्हाद दादा बाविस्करसर ,सामाजिक कार्यकर्ते श्री.देविदास फुलपगारे ,भरारी फाऊंडेशनचे अध्यक्ष दिपक परदेशी, व समस्त न्यु पार्वती नगरचे रहिवासी   उपस्थित होते.यावेळी नगरसेवक श्री.जितु भाऊ मराठे यांनी "निर्माल्य रथाचे  "लोकार्पण केले. हा रथ रोज सर्व कॉलनीतील निर्माल्य जमा करून नदीत विसर्जन करणार आहे .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने