महाजन इंग्लिश क्लासेस तर्फे चोपडा ग्रामिण पोलीस ठाण्यात रक्षाबंधन साजरा

 महाजन इंग्लिश क्लासेस  तर्फे चोपडा ग्रामिण पोलीस ठाण्यात रक्षाबंधन  साजरा 

चोपडा,दि.३०(प्रतिनिधी):शहरातील महाजन इंग्लिश क्लॉसेसने  रक्षाबंधन सोहळा आगळ्या वेगळ्या पद्धतीने  साजरा करण्याचा  मानस ठेवत एक धागा प्रेमाचा, एक धागा रक्षणाचा'  उपक्रम राबवून  सर्व विद्यार्थींनी  चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन गाठत  पोलिस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला.


रक्षाबंधनाला  भावाने बहिणीचे रक्षण करावे यासाठी बहिण आपल्या भावाला राखी बांधते  मात्र  आपले घरदार सोडून शहराची शांततेची नागरीकांच्या रक्षणाची जबाबदारी ज्याच्या खांद्यावर आहे त्या पोलीस बाधवांना मात्र कर्तव्य सोडून, घरापासुन दुर राहून बहिणीकडे जाता येत नाही  हे ध्यानी घेत 'महाजन क्लासेस'च्या विद्यार्थ्यांनीनी आज 'चोपडा ग्रामिण पोलीस स्टेशनला जावुन पोलीस बांधवांना राख्या बांधून | एक धागा प्रेमाचा विणला आहे.यावेळी पोलीस स्टेशनच्या PI सौ. कावेरी कमलाकर  ह्यांनी मुलीना आपल्या? भविष्याबद्दल व पोलीस खात्याबद्दल माहीती दिली  त्याचप्रमाणे मुलींनी 'झाडांना 'देखील राख्या बांधून निसर्ग व पर्यावरणाची दखल घ्यावी असा सल्ला देऊन क्लासेसचे संचालक दिपक महाजन सरांचे संपूर्ण पोलीस स्टेशनच्या वतीने आभार मानले. यावेळी  श्रेया मोरे, देवी पाटील, लक्षिता पाटील, भुमी पाटील, हेमश्री पाटील, श्रूती सोनवणे, नक्षत्रा सोनवणे, प्रांजल सानप, दिया पाटील, दिव्या माळी, मयुरी बाविस्कर, जानवी चौधरी, मानसी चौधरी, नक्षत्रा कापुरे, किर्ती कुमावत आदी विद्यार्थींनीं सहभाग घेतला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने