कुरवेल ग्रामसभा गाजली.. ग्रामसेवकापुढे वाचला समस्यांचा पाढा
चोपडा दि.३१(प्रतिनिधी):तालुक्यातील कुरवेल येथील ग्रामपंचायतीत नुकतीच ग्रामसभा घेण्यात आली असून अनुपस्थित आरोग्य अधिकारी, कृषी अधिकारी तसेच काही ग्रामपंचायत सदस्य यांच्या बाबतीत प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येऊन अनेक समस्यांबाबत ग्रामसेवकास धारेवर धरण्यात आले.
ग्रामसभा नियमित घेण्यात येत नसल्याचे सांगत ग्रामस्थांनी ग्रामसेवक स्वप्नील निनायदे यांच्या वर एका नंतर एक गावातील समस्यांचा पाढा वाचून दोष दिला. गावातील विकास कामांची यादी सार्वजनिक करावी असा आग्रह धरला .
ग्रामसेवकाने ग्रामसेवक हा जनतेच्या हितासाठीच ग्रामपंचायत येथे कार्यरत असतात, तसेच मी देखील आहे आणि कुरवेल गावातील सर्व समस्यांचा पाठपुरावा करून लवकरात लवकर सोडविन असे आश्वासन ग्रामसेवकाने दिले.
ग्रामसभा नियमित घेण्यात यावी, आणि गावातील मंजूर विविध योजने अंतर्गत असलेले विकास कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावेत असे ठरले.