शासकीय बहुउद्देशीय दिव्यांग संमिश्र केंद्रात पालक मेळावा आयोजित


  शासकीय बहुउद्देशीय दिव्यांग संमिश्र  केंद्रात पालक मेळावा आयोजित

जळगाव दि.२५(प्रतिनिधी) दिनांक २३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११.00  वाजता सिंध्दी कॉलनी शासकीय  बहुदेशिय दिव्यांग संमिश्र केंद्रात पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री भरत चौधरी   ( वैद्यकीय सामाजिक अधिकारी ) व समाज कल्याण दिव्यांग विभाग अधिकारी भरत चौधरी   त्यांचे हस्ते प्रथमतः सरस्वती मातेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून मेळाव्या सुरुवात करण्यात आली.

 भरत चौधरी  यांनी मार्गदर्शन करून मेळाव्याचे उद्दिष्ट म्हणजे पालक, विद्यार्थी,कर्मचारी व अधिकारी यांच्यातील सुसंवाद हे आहे. साहेबांनी दिव्यांग अधिनियम २०१६ कायद्याची माहिती देऊन दिव्यांग कल्याणकारी ५% राखीव निधी, प्रमाणपत्र, शिष्यवृत्ती, याबाबत माहिती दिली, त्यावेळी साहेबांनी पालकांच्या प्रतिक्रिया, नवीन विद्यार्थ्यांनी दिव्यांग संमिश्र केंद्रात प्रवेश घेतलेले विद्यार्थी, देखभाल व्यवस्थापन समिती  यांच्याशी चर्चा करून त्यांच्या प्रतिक्रिया  जाणून घेतल्या.या पालक मेळाव्यासाठी सुरत, नंदूरबार, चाळीसगाव लांब लांब अंतरावरून पालक आलेले होते.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय महाजन व आभार गणेश पाटील यांनी मानले. या कार्यक्रमांमध्ये दिव्यांग संमिश्र केंद्र जळगाव  वैद्यकीय अधीक्षक डॉ  किरण शिरसाठ, प्रवीण भोई जितेंद्र पाटील तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमजान तडवी राजेंद्र ठाकूर श्याम सोनवणे विलाश पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या अंति विद्यार्थी व पालकांना सुरुची भोजनाची व्यवस्था करून त्यात  खानदेशी वरण बट्टी  व वांग्याची भाजी  यांचा आस्वाद घेतला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने