अकूलखेडेत बोन्डअळी नियंत्रणावर मार्गदर्शन

 अकूलखेडेत बोन्डअळी नियंत्रणावर मार्गदर्शन 


अकुलखेडे....उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना मार्गदर्शक.

गणपूर(ता चोपडा)ता 23: अकुलखेडे(ता चोपडा)येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एल डी सी कंपनी मार्फत सी एस आर जागृती प्रकल्पांतर्गत ॲफ्रो  संस्थेच्या सहकार्याने कापूस पिकावरील गुलाबी बोंड आळी व तिचे एकात्मिक नियंत्रण तसेच कापूस उत्पादकता वाढ संदर्भात शेतकरी चर्चासत्र घेण्यात आले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळ कृषी अधिकारी आर ए पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून एल डी सी कंपनीचे दीपक शिंदे , दुर्गेश चव्हाण कृषी सहाय्यक दीपक पाटील उपस्थित होते.

यावेळी एकात्मिक कीड व्यवस्थापन,  फेरोमोन सापळे  तसेच जैविक खते यांचे महत्व याची माहिती देण्यात आली.गुलाबी बोन्ड अळी व्यस्थापना संदर्भात जागृती प्रकल्पा बाबत व कृषी निविष्ठांच्या योग्य वापरा संदर्भात आणि शेतीमध्ये होत असलेल्या आधुनिक बदलांबाबत  दीपक शिंदे यांनी मार्गदर्शन केले. वढवानी संस्थेच्या  जे. पी. त्रिपाठी यांनी त्यांच्या बोन्ड अळी समबंधित ऍप चे प्रात्यक्षिक व त्याचे फायदे समजावून सांगितले. यावेळी प्रत्येकी आठ कामगंध सापळे एल. डी. सी. मार्फत मोफत वाटप करण्यात आले.चर्चासत्राला शंभराहून अधिक शेतकरी  उपस्थित होते........

.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने