बहुजन समाज पार्टीचा चोपडा तहसीलवर धडक मोर्चा
चोपडा दि.२३(प्रतिनिधी) दिनांक 22-8-2023 रोजी बहुजन समाज पाटीॅ तफेॅ चोपडा तहसील कार्यालयावर धडक मोर्चो जिल्हा सचिव युवराज बारेला व व चोपडा विधानसभाध्यक्ष सचिन बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आला . निवेदनात म्हटले आहे की,अनुसूचित जाती ,अनुसूचित जमातींवर होणार्या अन्याय अत्याचार, दिवसेंदिवस वाढत आहे आपला देश स्वतंत्र होऊन 75 वर्षाचा वर झाली , भारत हा लोकतांत्रिक देश आहे ,तसेच प्रत्येक व्यक्तीला संविधानाने मूलभूत अधिकार दिले आहे , तरी देखील अनु ,जाती ,अनु ,जमातींवर जादीवादी विचार सरणीच्या संकुचित वृत्तीच्या लोकांकडून अन्याय अत्याचार, हे होत आहे,मग आपण खरच स्वातंत्र झालो का ,संविधान नुसार आपण खरच वाटचाल करीत आहोत का ? असा प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे,तसेच ग्रामपंचायत, नगर परिषद अंतर्गत येत असलेले गरीब मोल मजुरी करणारे, आथिर्क दृष्टया कमवकुवत असलेले गरजु सामान्य नागरिक 30 -40 वर्षा आधिपासुन ग्रामपंचायत, नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या जमीनीवर अतिक्रमण करुन आपला व आपला परिवाराच्या उदनिॅवाह करीत आहे,अशांना जमिनीचे पट्टे देऊन घरकुल मंजूर करण्यात यावे,ह्यामुळे आथिर्क दुर्बल घटकांचा विकास होइल तसेच ग्रामपंचायत, नगर परिषद, यांची देखील आवक वाढेल, तसेच वाढत्या महंगाई मुळे व प्रत्येक वस्तुवंर 18% जी एस टी लावल्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहे. विद्युत महामंडल ने जे युनिट दर वाढविले आहे त्यामुळे सामान्य नागरीकांची कंबर तोडुण टाकली आहे, जर सामान्य नागरिकास लाईट बील भरण्यासाठी उशिर झाला तर लगेच लाईट कट करतात, लाईट कट केल्यां नंतर त्या परिवाराला अनेक संकटांच्या सामना करावा लागतो ,विद्युत महामंडल त्यांची परिस्थित समजुन घेत नाही, व कट झालेले लाईट बील उशिर भरले, तर जोड्यायला येत नाही, त्यांना उडवा- उडवीचे, उत्तर दिले जातात, त्रास दिला जातो, तसेच शासन प्रशासन अंतर्गत वाटप करण्यात आलेल्या, ग्राहक सेवा केंद्र, ऑनलाइन ई महा केंद्र, हे आपली मनमाणी करूण, विद्यार्थांन कडुन व सामान्य नागरिकांडुन, नको ती फी आकारतात, जीथे उत्पन्न दाखल याला, समजा 50 रूपये लागतात, तीथे 100 शंभर रुपए आकारतात, कास्ट सटिर्फिकेट, डोमिसाइल ,व्हॅलिडीटी, नको ती फी आकारतात, तसेच उत्पन्न दाखल, कास्ट सटिर्फिकेट, डोमिसाइल सटिर्फिकेट, व्हॅलिडीटी, हे ऑनलाइन पध्दत मधे लवकरात लवकर झाले पाहिजे त्याला उशिर होतो, उत्पन्न यांला 1 ते 2 दिवस लागल्या पहीजे त्याला 5 ते 7 दिवस लागतात, कास्ट, डोमेसियल, व्हॅलीडिटी, यांना तर 45 ते 60 दिवस लागतात, त्याच प्रमाणे, शासना मार्फत जे विद्यार्थांन कडुन ऑनलाइन पध्दतीने शासकीय नौकरीचे फार्म साठी 900-1000 चलन घेतले जाते, ह्या मुळे विद्यार्थांच व सामान्य नागरिकांच शैक्षणिक, आथिर्क सामाजिक, मानसिक, शारीरिक, नुकसान होत, हे मुद्दे लक्षात घेता, संदर्भात शासन प्रशासन ने कायदेशीर चौकशी करुन कार्यवाही करून न्याय द्यावा असे म्हटले आहे.
यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष नारायण अडकमोल, शहर अध्यक्ष रूपचंद भालेराव, माजी विधानसभा प्रभारी संजय अहीरे, ईरफान तडवी, तसेच मिलींद सोनवणे, आदील तडवी, तुकाराम बारेला, अमरसिंह बारेला, दिनेश बारेला, सुनिल बारेला, शामसिंग बारेला, वसंत शिंदे, तुषार सिरसाट, प्रशांत बाविस्कर, मुकेश बारेला, अनिल मोरे,बळीराम बारेला, जि बीव्हीफ संयोजक अनिल वाडे, संदिप साळुंखे, सुभाष शिंदे, सुरेश बारेला, प्रविण करंकाड, सुनिल बारेला, दिनेश बारेला, अनिल बाविस्कर, ज्ञानेश्वर, अहिरे, इ कार्यकर्ता उपस्थित होते ..