आता पुण्यातही साजरा होणार कानबाई मातेचा उत्सव..खान्देशवासीय एकवटल्याने "कानबाई चालनी गंगेवरी माय"गीत गुंजणार..
चाकण पुणे दि.२० (वार्ताहर महेंद्र पाटील):आज दिनांक 20 रोजी चाकण पुण्यातील खान्देश बांधवांची जाहीर मिटिंग संपन्न झाली, त्यात सर्व बांधवांनी आपले मत व्यक्त केले त्यात खान्देश चे दैवत उत्सव कानबाई मातेचा उत्सव हा खुप थाटामाटात साजरा करायचा आहे हे ठरले .
यात असे मत व्यक्त करण्यात आले की आपलं आपले खान्देश सोडून प्रत्येक माणुस हा कमीत कमी 300 किलोमीटर गाव सोडून आलेले आहे त्यात आपल्याला आपल्या मातेच्या उत्सव साजरा करायला एवढ्या लांब जाता येत नाही तर आपण हाच उत्सव चाकण मध्ये साजरा केला तर ...यात जातपात न बघता आपली माती ही खानदेशी आहे आणि आपण सर्व खान्देश बांधवांनी ज्यांच्या कडून काही मदत होत असेल तर प्रत्येक माणसांनी त्यांच्या परीने मदत करावी, जे समाजसेवक असतील त्यांनी समाजसेवा करावी ,त्यांचे इलेक्ट्रिक चे काम असतील त्यांनी मिरवणूक साठी मदत करावी आणि धूमधडाक्यात आपली खान्देश ची दैवत कानबाई मातेचा उत्सव साजरा करावा हे प्रत्येक माणसाने बोलताना मत व्यक्त केले..यात दत्ताभाऊ परदेशी, किशोर भाऊ अहिरे, महेंद्र पाटील,मनोज भाऊ पाटील,प्रशांत भाऊ ,दिलेलं पाटील,सौ. अरुणाताई पगारे,बोरसेताई जितेंद्र सोनवणे व असंख्य खान्देश बांधव हजर होते
