बस व ट्रकची जोरदार धडक
पाचोरा दि.१८( प्रतिनिधी )सातगाव रोड मोंढाळे जवळील मौनगिरी साखरकारखाना जवळ सातगाव-मोंढाळे-पाचोरा रस्त्यावर बस व ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला असून यात बसमधील विद्यार्थी काही प्रवासी असे सर्व २० ते २१ जण जखमी झाल्याची वार्ता मिळाली आहे.
पाचोरा आगाराची घोसला ते पाचोरा ही मुक्कामी बस प्रवासी व विद्यार्थी घेऊन पाचोऱ्याकडे येत असतांना. सातगाव ते पाचोरा- मोंढाळा रस्त्यावर मौनगिरी साखर कारखान्यासमोर आज (१८ जुलै) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बस व ट्रकची समोरासमोर धडक झाली. अरुंद व खराब रस्ते असल्याने बस व ट्रकचा वेग कमी असल्याने अनर्थ टळला. जीवित हानी टळली आहे.
