जिल्हा आटयापाट्या संघटनेचे खेळाडू विशाल निवृत्ती फिरके यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर

 जिल्हा आटयापाट्या संघटनेचे खेळाडू विशाल निवृत्ती फिरके यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर  



जळगाव दि.१८(प्रतिनिधी):  जिल्हा आटयापाट्या संघटनेचा खेळाडू व भुसावळ येथे मध्य रेल्वेत अभियंता पदी कार्यरत असलेला  विशाल निवृत्ती फिरके यास महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर  करण्यात आला आहे.  

त्यांनी सिद्धिविनायक विद्यालयातुन आपल्या खेळाडू जिवनाची सुरवात केली आहे. राष्ट्रीय आट्यापाट्या खेळात ख्याती असलेले  विशाल निवृत्ती फिरके यास महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर  करण्यात आला. विशालने केलेल्या अभिमानास्पद कामगिरीबद्दल त्याचे पेढे भरून व पुष्पगुच्छ देऊन  अभिनंदन व कौतुक जिल्हा संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार आण्णासो प्रा. चंद्रकांत सोनवणे  यांनी केले. याप्रसंगी जिल्हा संघटनेचे सचिव  शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त डॉ. प्रदीप तळवेलकर,  व विशालचे प्रशिक्षक श्री अनिल माकडे सर ,जिल्हा क्रीडा कार्यालयाचे  मीनल थोरात व नितीन चौधरी सर चोपडा हे उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने