कै.पि.के.शिंदे माध्यमिक विद्यालयात"तारांगण चा कार्यक्रम संपन्न.!

 कै.पि.के.शिंदे माध्यमिक विद्यालयात"तारांगण चा कार्यक्रम संपन्न.!


*पाचोरा दि.२२ (प्रतिनिधी ):पाचोरा येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलित श्री पि.के.शिंदे माध्यमिक विद्यालय मध्ये पोलाद स्टील  बांधकामाला लागणारी सळई या कंपनी मार्फत FREE OF COST तारांगण चा कार्यक्रम दाखवण्यात आला त्या मध्ये संपूर्ण ग्रह उपग्रह तसेच पृथ्वी चंद्र यांची एकमेकाभवती फिरण्याची स्थिती,व इतर भुगोल-खगोल विषयावर ची माहिती विद्यार्थ्यांना 3D अनिमेशन द्वारा समजायला खूप सोईस्कर झाली. या पोलाद स्टील बांधकामाला लागणारी सळई कंपनीच्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी आवर्जून व आवडुन बघीतला व समाधान व्यक्त केले की आम्हाला ग्रह,तारे पृथ्वी याच्यविषयी खुप जवळुन माहिती मिळाली व आमच्या बुद्धीला चालना मिळाली त्यामुळे मुलांना भूगोल या विषयात रुची वाढायला मदत नक्कीच होईल... या विषयी शिक्षकांना विद्यार्थ्यांना भुगोल-खगोल विषयावर शिकवतांना खुप सोयीस्कर होईल.खुप छान कार्यक्रम आयोजित करण्यात आला विद्यार्थींनी खुपच आनंद व्यक्त केला, याविषयी कै पि.के.शिंदे शाळेचे मुख्याध्यापक श्री एस.व्ही गिते सरांनी पण समाधान व्यक्त केले त्यांनी पण पोलाद स्टील कंपनी ला विनंती केली की हा कार्यक्रम प्रत्येक शाळेत आयोजित करण्यात आला पाहिजे जेणेकरून मुलांना भुगोल-खगोल विषयावर माहिती मिळेल व शेवटी कंपनीचे आभार व्यक्त केले करुन कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने