सौ. योगिता मांडवडे यांचे एम.पी.एस.सी. परीक्षेत घवघवीत यश
गणपूर(ता चोपडा)ता 20(प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक रासायनिक विश्लेषक (वैज्ञानिक अधिकारी) या पदाचा निकाल नुकताच जाहीर झाला.या परीक्षेत जळगाव जिल्ह्यातील सौ. योगिता किरण मांडवडे यांनी परीक्षेचे सर्व टप्पे पार करत यशाला गवसणी घातली आहे .त्यांची वैज्ञानिक अधिकारी या पदावर निवड झाली आहे. त्या सेवानिवृत्त बँक कर्मचारी आनंदसिंग प्रताप पवार, (वरखेडे ता. चाळीसगाव )यांच्या कन्या तसेच कृषी विज्ञान केंद्र,ममुराबाद (जळगाव) येथील शास्त्रज्ञ किरण मांडवडे यांच्या पत्नी आहेत. हे यश मिळवणाऱ्या त्या जळगाव जिल्ह्यातील एकमेव आहेत.
