मोटरसायकल व आयसरच्या धडकेत दोन जण गंभीर जखमी

 

मोटरसायकल व आयसरच्या धडकेत  दोन जण गंभीर जखमी

चोपडा दि.२०(प्रतिनिधी )-- शहरालगत असलेल्या हॉटेल इंडिया समोर  आयसर व मोटरसायकलची सामोरा समोर धडक झाली त्यात मोटारसायकल चालकसह एक जण गंभीर झाले आहे.

 सविस्तर असे की, आयसर गाडी क्रमांक एम.एच. 04 एल 6891  ही चोपडा कडून  धरणगाव कडे जात होती आणि धरणगाव कडून मोटरसायकल क्रमांक एम.एच.19 बी.डी.7538 ही मोटारसायकल ची आयसरची धडक हॉटेल इंडियाचा समोर झाली यात मोटरसायकल चालक बिरजु भटा बारेला (35,) रा.साळवा ता. धरणगाव यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने याची परिस्थिती गंभीर होती  त्यांच्या सह साथीदार राजाराम कण्हश्या बारेला (33) पांझऱ्या (वरला, मध्यप्रदेश) याचाही डोक्याला मार लागल्याने हा ही गंभीर जखमी होता ह्या दोघांवर प्राथमिक उपचार करून यांना जळगाव हलविले असल्याचे उपजिल्हा रुग्णालयातुन माहिती देण्यात आली. राजाराम बारेला याची मुलगी येथील महात्मा गांधी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे तिला भेटून यावल कडे जात होते असेही त्यांच्या नातेवाईकानी सांगितले. तसेच बिरजु बारेला व राजाराम बारेला हे दोघे साला मेहुण्याचे नाते असल्याचे समजते. याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी तात्काळ हजर झाले होते यावेळी बिआरएस चे कार्यकर्ते दीपक पाटील यांनी परिश्रम घेतले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने