कौतिक सांडू चौधरी यांचे 101 वर्षात पदार्पण.. शहरातील ब्राह्मण पंडितांची हजेरी

 कौतिक सांडू चौधरी यांचे 101 वर्षात पदार्पण.. शहरातील ब्राह्मण पंडितांची हजेरी


 चोपडा दि.२७( प्रतिनिधी) येथील सुदर्शन कॉलनीतील रहिवासी श्री. कौतिक सांडू चौधरी यांनी 101 वर्षात पदार्पण केल्याबद्दल  दि. २७.०७.२०२३ वार गुरुवार रोजी,सकाळी : ११.३० ते २.०० डॉ. हरताळकर यांचे हॉस्पिटल समोर,श्री कृष्ण मंदिर वार्ड, तेलीवाडा चोपडा येथे श्री ब्राम्हणभोजनाचा कार्यक्रम सोत्साहात पार पडला.

सध्या धकाधकीच्या जीवनात शंभरी पार करणे अगदी मुश्किल काम झाले असतांना वयाचा  एव्हढा मोठा टप्पा पार करणारे भाग्यवंतमध्ये  कौतिक सांगू चौधरी यांचा नंबर लागतो असे म्हणणे काही वावगं ठरणार नाही.त्यांच्या  वाढदिवसाचे औचित्य साधत चोपडा शहरातील सर्व ब्राह्मण पंडितांना त्यांचे सुपुत्र सुनील चौधरी यांनी स्नेहभोजन महाप्रसादाचे आयोजन केले होते. यावेळी ब्राह्मण पंडितांनी मंत्र घोष पूजाअर्चा नंतर स्नेह भोजनाचा लाभ घेतला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने