मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या शुभहस्ते चोपडा एस.टी.आगार व्यवस्थापक महेंद्र पाटलांचा खास गौरव.. उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शाब्बासकीची थाप..!

 

मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या शुभहस्ते चोपडा एस.टी.आगार व्यवस्थापक महेंद्र पाटलांचा खास गौरव.. उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शाब्बासकीची थाप..!

चोपडा दि.२२(प्रतिनिधी):  राज्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या एस.टी.आगाराच्या व्यवस्थापकांचा यथोचित गौरव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आला .त्यात चोपडा आगाराचे व्यवस्थापक महेंद्र पाटील यांचे विशेष सन्मान झाला.

एस.टी.महामंडळाच्या ७५ व्या  अमृत  महोत्सवी वर्षानिमित्त सन २०२२ - २०२३ मधील फलनिष्पत्ती मूल्यांकनात  महाराष्ट्र राज्यातील २५० आगारापैकी ९ अतिउत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आगारांमध्ये चोपडा आगार हे एक होतं त्यामुळे  मुंबई येथे   चोपडा आगाराचे आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे  यांच्या शुभहस्ते  यथोचित असा खास गौरव करण्यात आला
मंचावर मुख्यमंत्री  एकनाथराव शिंदे , ज्येष्ठ मराठी कलावंत श्री मकरंद अनासपुरे,महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री शेखर जी चन्ने,आमदार भरत शेठ गोगावले,   परिवहन आयुक्त पराग जैन मान्यवर उपस्थित  होते.


चोपडा आगाराने केलेल्या उलेखनीय कामगीरीचे विभागीय स्तरावर सर्वत्र कोतुक होत आहे. भविष्यात देखील अशीच उल्लेखनीय व उत्कूष्ट कामगीरीचे सातत्य टिकवुन ठेवणार व चोपडा आगार महाराष्ट्रात अव्वल क्रमांक आणण्यावर भर असेल अशी ग्वाही आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी यावेळी दिली.तर आगाराला मिळालेला पुरस्कार हा आगारातील सर्व कर्मचार्यांनी केलेल्या मेहनतीचे फळ असुन हा पुरस्कार कर्मचार्यांना समर्पित करतो असे त्यांनी पाटील यांनी म्हटले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने