स्वराज्याची पायाभरणी व स्थापनेतील विविध पैलूचे व्यवस्थापन म्हणजे जिजाऊ होय - प्रतिभा कोळी

 स्वराज्याची पायाभरणी व स्थापनेतील विविध पैलूचे व्यवस्थापन म्हणजे जिजाऊ होय - प्रतिभा कोळी 


भडगावं,दि.१९(प्रतिनिधी-जिजाऊ यांना स्वतंत्र मराठा स्वराज्याचा ध्यास लागलेला असल्याने स्वराज्यासाठी सुखाचा मार्ग सोडून खडतर मेहनत घेतली जिजाऊ ह्या ध्येयनिष्ठ, पतीनिष्ठ आणि तितक्याच कठोर अंतःकरणाच्या न्याय प्रिय व मायाळू ,दुःखिताची सेवा करणार्‍या कृतिशील लोकमाता होत्या. जिजाऊ ह्या बुद्धिमान, संयमी, कुशल प्रशासक, न्यायनिष्ठुर, काळाला अनुसरून स्वभावाला मुरुड  घालणार्‍या, अन्यायाचा प्रतिकार करणार्‍या, उत्साही, जिद्दी, धाडसी आणि सर्वाना बरोबर घेऊन चालणार्‍या, धार्मिक प्रवृत्तीच्या असल्या तरी अंधश्रद्धाळू  मुळीच नव्हत्या. हिंदवी स्वराज्याची कल्पना, स्थापना, जडणघडण आणि त्याची उभारणी करण्यात शिवरायांना जिजामाता प्रत्येक वेळी चर्चा करून मार्गदर्शन करत होत्या. अत्यंत कठीण परिस्थितीत तोंड देणे, करारी स्वभाव, माणसे जोडण्याची कला म्हणजे जिजाऊंचे उत्कृष्ठ व्यवस्थापन होय " असे विचार सौ. प्रतिभा कोळी यांनी मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. सुरेश कोळी हे होते. व्यासपीठावर संस्कृती फाऊंडेशन चे अध्यक्ष डी बी  कोळी प्रतिभा कोळी, स्वाती पवार, भारती मोरे, चेतन पाटील, भाग्यश्री शिंपी होत्या 

      कार्यक्रमाच्या प्रारंभी जिजाऊच्या, राणी लक्ष्मीबाई व भारतमाता प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संस्कृती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा भडगाव यांच्या सयुंक्त विद्यमाने जिजाऊ पुण्यतिथी व राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी शुभांगी पाटील, दिव्या अहिरे, निकिता पाटील, भावना शिंपी, अजय मोरे, सतीश गांगुर्डे, सतीश सोनवणे,जयदीप पाटील उदय सोनवणे गोपाळ पाटील कल्पेश परदेशी नीलेश परदेशी पवन पाटील सूरज परदेशी दीपेश पाटील हर्शल पाटिल मनोज देसले यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाती पवार यांनी, सूत्रसंचालन भारती मोरे यांनी व आभारप्रदर्शन भाग्यश्री शिंपी यांनी केले .यावेळी मोठय़ा संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने