आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी आल्याने प्राण्याची कुर्बानी देऊ नये..पोनि के.के.पाटलांचे आवाहन*

 *आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी आल्याने प्राण्याची कुर्बानी देऊ नये..पोनि के.के.पाटलांचे आवाहन

चोपडा,दि.२६(प्रतिनिधी )* - यंदा एकाच दिवशी आषाढी एकादशी व बकरी ईद आल्याने एक सण कुर्बानीचा तर दुसऱ्या बाजूस उपवास असतो इतर तालुक्यात मुस्लिम बांधवांनी घेतलेला निर्णयानुसार कोणत्याही प्राण्याची कुर्बानी देऊ नये व सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवावे असे आवाहन चोपड़ा शहर पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी व्यक्त केले. ते   आयोजीत करण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, चोसाका माजी अध्यक्ष अँड. घनश्याम पाटील, प्रभारी तहसीलदार गौरी धायगुडे, पशुधन विकास अधिकारी डॉ प्रिया बागडे, डॉ. श्वेता मोरखडे, नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक व्ही. के. पाटील, सपोनि अजित सावळे, संतोष चव्हाण, प्रवीण गुजराथी, मनसे नेते अनिल वानखेडे, अमृत सचदेव, अॅड. धर्मेंद्र सोनार, डॉ रवींद्र पाटील, नरेश महाजन, आबा देशमुख, शेखर पाटील, राजेंद्र पाटील, किशोर चौधरी, रमेश शिंदे, कैलास सोनवणे, राजाराम पाटील, नंदकिशोर सांगोरे, संतोष अहिरे, रवी मराठे, गोविंद सैंदाणे, भाजप तालुकाध्यक्ष पंकज पाटील, प्रदीप पाटील, यशवंत चौधरी, प्रफुल स्वामी, प्रफुल पाटील, सनी सचदेव, समाधान माळी आदी उपस्थित होते.

यावेळी के के पाटील म्हणाले की, ५ ते ७ दिवसांपूर्वी शहरात दोन समाजात वाद निर्माण झाला होता शहराचे वातावरण क्लुषित झाले होते पण काही नागरिकांनी मदत केल्यामुळे तात्काळ वातावरण शांत झाले. सोशल मीडियावर आलेले मेसेज काही खातरजमा न करता पुढे पाठवितात ते करू नये. सोशल मीडिया तसेच स्टेटस वर पोलिसांचे लक्ष असते याची दखल पोलिसांकडून घेतली जाते. काही जण गोरक्षक म्हणून काम करतात अवैध जनावरे वाहतूक करतांना आढळून आल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी परस्पर मारहाण किंवा इतर वेगळा प्रकार करू नये. शहरात चोरीचे सत्र वाढत आहे यासाठी व्यापारी बांधवांनी दुकानाच्या बाहेर एक कॅमेरा पोलिसांसाठी व लोकांसाठी लावावा. प्रत्येक सण उत्सवात पोलिसांची गरज असते त्यामुळे शांतता राहते. आम्हालाही वाटते की, सण उत्सवाचा आनंद आपण ही घ्यावा पण तो घेता येत नाही. शहराची लोकसंख्या जवळपास एक लाख आहे एवढया जनतेतून आपली निवड शांतता कमिटी सदस्य म्हणून केली आहे. आपणही पोलिसांना सहकार्य करावे.

यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ प्रिया बागडे यांनी सांगितले की, गोवंश सोडूनच कुर्बानी साठी परवानगी असते तसेच जी म्हैस उत्पादन देऊ शकत नाही, शेती कामात उपयोग होत नाही अशी जनावरे कुर्बानी देता येतात. यावेळी विधानसभा माजी अध्यक्ष अरुण गुजराथी म्हणाले की, आषाढी एकादशी, बकरी ईद एकाच दिवशी आल्याने शांततेने पार पाडावे दोन्ही सण साजरे करा नेहमी दोन्ही समाजाचे प्रतिनिधी असतात पण यावेळी एकच समाज दिसत आहे याबाबत त्यांच्याशी चर्चा करावी योग्य तो तोडगा काढावा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने