ग स सोसायटी मार्फत पाच लक्ष रु चा अपघात विमा योजनेचा धनादेश मयताच्या वारसास वितरीत

 ग स सोसायटी  मार्फत पाच लक्ष रु चा अपघात विमा योजनेचा धनादेश  मयताच्या वारसास वितरीत

*चोपडा,दि.२६(प्रतिनिधी महेश शिरसाठ): ग.स.सोसायटी चे अध्यक्ष श्री उदय पाटील यांच्या नेतृत्वाखालील  संपूर्ण कार्यकारी मंडळाने सभासद हिताचे अनेक चांगले निर्णय घेतले. कोणत्याही कारणाने वर्षभरात मयत झालेल्या सभासदांची संपूर्ण कर्जमाफी, कर्जाच्या व्याजदरात केलेली कपात यासारखे सभासद हिताचे निर्णय झालेले असुन ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचा जनता अपघात विमा देखील संस्थेचे अध्यक्ष श्री. उदय पाटील यांचे अध्यक्षतेखालील संचालक मंडळाने सदरील अपघात विमा रक्कमेत वाढ केल्यानंतर चोपडा तालुक्यातील जि प शाळा कठोरा येथील उपशिक्षक कै. नितीन दामोदर मोरे यांचे दि 23 जानेवारी 2023 रोजी अपघाती निधन झाले होते. सदर मयताच्या वारस पत्नी श्रीमती योगिता नितीन मोरे यांना वाढीव पाच लक्ष रु .चा धनादेश  संस्थेच्या जेष्ठ सभासद सुरेखा पाटील तसेच ज्योत्स्ना सनेर, ज्योती कोळी, श्री हिंमतराव पाटील. आर. आर .धनगर यांचे हस्ते व ग.स. चे चोपडा येथील स्थानिक  संचालक योगेश सनेर, मंगेश भोईटे यांचे उपस्थितीत देण्यात आला.*

        *याकामी संस्थेचे व्यवस्थापक श्री वाल्मिक पाटील तसेच ज्ञानेश्वर बाविस्कर, शामकांत सोनवणे,भगवान मिस्तरी व चोपडा येथील शाखाधिकारी माधवराव सोनवणे यांनी परिश्रम घेतले असुन संस्थेच्या सभासदांच्या सोबत जिंदगी के साथ भी और जिंदगीके बाद भी या उपक्रमाबद्दल सभासदांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने