पाचोऱ्यात नूतन प्रांताधिकारींचा सत्कार
पाचोरा दि.२७( प्रतिनिधी राजेंद्र खैरनार ): दिनांक २६ रोजी सोमवारी सकाळी सिंदखेडराजा जिल्हा बुलढाणा येथून बदली होऊन पाचोरा येथे रुजू झालेले प्रांताधिकारी सह उपजिल्हाधिकारी श्रीभूषण अहिरे सर यांचा सत्कार कृष्णापुरी-पाचोरा सौ. भारती बेंडाळे-सावंत, सामाजिक कार्यकर्ते व झटपट लाईव्ह न्युज चे संपादक तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जेष्ठ पदाधिकारी श्री. अनिल सावंत सर तसेच वार्ड क्र.३ त्र्यंबकनगर चे वैद्यकीय व्यवसाय मध्ये उल्लेखनीय कार्य करणारे डॉ बापू बेंडाळे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी नूतन प्रांताधिकारी यांनी सखोल सविस्तर सामाजिक, तसेच भौगोलिक परिस्थिती याची माहिती जाणून घेतली व विचारणा केली.
नूतन प्रांताधिकारी मूळचे नाशिक जिल्ह्यातील असून सटाणा येथील आहेत त्यांनी कौटुंबिक बारीक चर्चा केली प्रशासकीय कामाच्या बाबत एकमेकांना सहकार्य करण्याचे सर्वांनी एकमेकांना उद्देशून सांगून चहापाणी करून आदरातिथ्य नूतन प्रांताधिकारी निरोप घेतला