मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन यांना कॅलिबर भेट

 मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते  दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष  अक्षय महाजन यांना कॅलिबर भेट 

जळगाव दि.२७(प्रतिनिधी): शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मुख्यमंत्री ना.श्री. एकनाथजी शिंदे  व उपमुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस  यांच्या हस्ते दिव्यांग सेना जळगाव जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन सर यांचा सत्कार करून त्यांना कॅलिबर भेट देण्यात आली. त्यावेळेस अक्षय महाजन सर यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री  यांच्याशी दिव्यांग बांधवांबद्दल चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, मी तात्काळ जळगाव मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांना सांगतो की दिव्यांग बांधवांचे सर्व कामे मार्गी लावा व त्यांना शासकीय योजनेचा लाभ द्या असे आश्वासन दिले.

यावेळी मंचावर ना. श्री. गिरीशजी महाजन  ग्राम विकास व पंचायतराज मंत्री, ना. श्री. गुलाबरावजी पाटील पाणीपुरवठा व स्वच्छता, पालकमंत्री,ना. श्री.अब्दुल सत्तार कृषी मंत्री,. ना. श्री.दादा भुसे मंत्री, खा. रक्षाताई खडसे, खा. उमेश पाटील,आमदार. राजू मामा भोळे, आमदार संजय सावकारे, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील,आमदार मंगेश चव्हाण, आमदार लता सोनवणे,आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, अधिकारी वर्ग उपस्थित होता.


 *दिव्यांग सेना जिल्हा प्रसिद्धीप्रमुख विशाल दांडगे*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने