लहान भोई वाड्यात घराचे कुलूप तोडून २२हजांचा ऐवज चोरी


लहान भोई वाड्यात घराचे कुलूप तोडून २२हजांचा ऐवज चोरी

चोपडा दि.२१(प्रतिनिधी):  शहरात दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण कमी न होता वाढतच असून दररोज एक तरी होत असल्याने नागरिक परिपूर्ण धास्तावले आहेत.काल मध्यरात्रीच्या सुमारास लहान भोई वाड्यात शालिनी हॉस्पिटलजवळ गोपाल प्रकाश बडगुजर यांच्या घराचे मागील दरवाजाचे कूलूप तोंडून आत प्रवेश करून १०हजार४००रुपयाची रोकड ११हजार रुपये किंमतीचा मोबाइल पोबारा केल्याची घटना घडली.वास्तविक पाहता घरत पुढच्या खोलीत ४ व्यक्ती झोपलेल असतांना अज्ञात चोरट्यांनी मजल मारल्याने रहिवासी भयभीत झाले आहेत.
तहसील कार्यालयावर नेईल नास्त्याची गाडी लावणारे गोपाल प्रकाश बडगुजर यांच्या घरी खालील मजल्यावर ४जण, गच्चीवर काही व्यक्ती  झोपलेल असतांना रात्री २:००वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागच्या बाजूला असलेल्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व घरातील कपाटाचे कुलूप तोडून १०हजार४००रुपयाची रोकड ११हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरून  संपूर्ण सामान पूर्णपणे अस्तव्यस्त करून पलायन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने