आषाढी एकादशी निमित्त पाचोऱ्यात अश्विनी आटो मोबाईल जवळ फराळ वाटप संपन्न
*पाचोरा दि.३०(प्रतिनिधी श्री राजेंद्र खैरनार)पाचोरा येथे *प्रती पंढरपुर श्रीक्षेत्र हरे.पिंपळगाव* येथे *पाचोरा, भडगाव चाळीसगाव* पंचक्रोशीतील विठुराया चे भक्त पायी दिंडी ने चालत येतात. या गेल्या अनेक वर्षांपासून *अश्विनी आटो मोबाईल* समोर *फराळ* वाटप करण्यात येतो. *सालाबादप्रमाणे यंदाही दिनांक 29 जून 2023 रोजी आषाढी एकादशी निमित्ता* ने रस्त्यावरील *श्रीक्षेत्रपिंपळगाव* येथे विठुरायांचे दर्शन घेण्यासाठी साठी जात असलेल्या भाविक भक्तांसाठी *पाचोरा शहरातील अश्विनी ऑटोमोबाईल समोर (भारत डेअरी बस स्टॉप शेजारी)* साबुदाणा तसेच केळी फराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. व हा फराळाचा कार्यक्रम हा अतिशय भक्तीमय मंगलमय वातावरणात संपन्न झाला
या शुभप्रसंगी विशेष म्हणजे *पाचोरा पोलिस स्टेशन चे दबंग पोलिस अधिकारी* आदरणीय *श्री राहुलजी खताळ साहेब* व त्यांच्या *पोलिस सहकाऱ्यांनी* पण मौलिक वेळ दिला.
परंतु यंदा फराळ वाटपाच्या या कार्यक्रमातुन एकूण रकमेतून खर्च वजा करून उरलेले *११ हजार,१११ रुपये* हे कृष्णापुरी येथील *सप्तश्रृंगी देवी मंदिराच्या बांधकामासाठी* विनोद पाटील यांना ही देण्यात आली,ही देणगी देतांना अश्विनी ऑटोमोबाईलचे संचालक श्री.संजयबापु एरंडे, राकेश भाऊ महाजन, कैलास काका भवर, नामदेव निंबाळकर, मनोज पाटील,गणेश पाटील,(गणेश टी) नानाभाऊ पडोळ (विवेक टायर्स), चिंतामण जाधव(जीभु) ,राहुल पाटील आदींची उपस्थिती होती.
यामध्ये सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत येथील *माऊली ग्रुप* चे सर्व सन्माननीय सदस्यांनी तसेच त्यांच्या *सहकाऱ्यांनी* सदर फराळ वाटपाच्या कार्यक्रमाच्या गोळा केलेल्या वर्गणीतून खर्च वजा जाता ११ हजार १११ रुपये कृष्णापुरी येथील सप्तशृंगी निवासिनी देवी मंदिर सुरू असलेल्या बांधकामासाठी देणगी देण्याचा निर्णय समस्त माऊली ग्रुप चे सर्व सन्मानिय विठुरायाचे भक्त सभासदांनी घेतला आहे. याबाबत माऊली ग्रुप व अश्विनी ऑटोमोबाईल जवळील सर्व गॅरेज मालक सह सर्व सहकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.