*गणपुर गावातील प्रचलित महानुभाव पंथ
चोपडा दि.20(प्रतिनिधी):जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील अनेर नदीच्या काठावर वसलेले एक सुंदर असे गाव गणपुर या ठिकाणी. अनेक प्रकारचे संप्रदाय आहेत त्यातील एक खूप मोठ्या प्रमाणावर प्रचलित असा महानुभाव पंथीय सांप्रदाय या गावांमध्ये महानुभाव पंथीय श्री दत्त मंदिर आहे गावकऱ्यांच्या श्रमातून आणि आर्थिक दानातून उभारण्यात आलेले एक भव्य दिव्य असे मंदिर वसलेले आहे
या गणपुर गावातील महानुभाव पंथीय सदभक्त महानुभाव पंथाचे पंचकृष्ण अवतार यांचे जन्मोत्सव त्याच प्रमाणे श्रीकृष्ण जन्माष्टमी व श्री दत्तात्रेय प्रभू जन्मोत्सवाच्या कार्यक्रम मोठ्या हर्ष उल्हासाने, गुण्यागोविंदाने एकमेकांमध्ये द्वेष भाव विसरून एकत्र येऊन साजरा करतात.
या गावांमध्ये जवळपास 150 महानुभाव पंथीय सांप्रदायिक कुटुंब आहेत. या महानुभाव पंथीयांचा प्रत्येक शुक्रवारी एक सत्संग असतो. यामध्ये सर्व बाळ गोपाळ प्रत्येक महानुभव कुटुंबीयातील सदस्य एकत्र श्री दत्त मंदिर येथे जमतात .व परब्रम्ह परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी दाखवलेल्या मार्गावर चालून दर शुक्रवारी देवपूजा प्रसाद वंदन तसेच लीळाप्रबोधन, आरती, विडा अवसर असे इत्यादी प्रकारचे धार्मिक विधी आचरित असतात.
या सत्संगा मार्फत आजच्या या प्रगतशील अत्याधुनिक युगातील तरुण पिढी परमेश्वर भक्ती मार्गाला येतात. त्याचप्रमाणे छोट्या छोट्या बाल गोपालांवर बाल संस्कार या सत्संगातून केला जात असतो.
मागील 20 वर्षांपासून आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी चालत आलेल्या या धार्मिक कार्यक्रमाला सत्संगाला महिला मंडळ,पुरुष ,तरुण, मुलं-मुली तसेच लहान लहान बाळ गोपाळ यांना एकत्रित रित्या सत्संग घडावा यासाठी गावातील अनेक सदभक्त कार्यशील राहतात छोटा मोठा असा कोणताही भेदभाव मनात न ठेवता परमेश्वर भक्ती मार्ग कसा आचरावा यासाठी संजय भीमराव पाटील ,रंगराव जगतराव पाटील,बाळकृष्ण गोपीचंद पाटील, ब्रीजलाल छबीलदास भावसार ,बापूजी दादाजी पाटील, रघुनाथ गोरख भावसार ,बाबुराव पंडित पाटील,वसंत नामदेव पाटील,रमेश वामन भावसार,दीपक दशरथ पाटील,पंकज सुरेश पाटील, नाना
शामराव पाटील,नंदू दत्तू पाटील,अशोक नथू पाटील सारख्या गणपुर गावातील महानुभाव पंथाचे वारस असलेले सदभक्तांचे मार्गदर्शन लाभत असते. त्याचप्रमाणे श्री रंगराव जगतराव पाटील (रंगा नाना) यांची प्रत्येक महानुभाव पंथीय संप्रदायकाचा घरी जाऊन महानुभाव पंथासाठी सर्व सदभक्तांना एकत्रित करण्याचे अनमोल सहकार्य विसरून चालणार नाही. त्याचप्रमाणे या गावांमध्ये मागील पन्नास वर्षांपासून महानुभाव संप्रदायातील लोक दर बुधवारी रात्री श्री दत्त मंदिर येथे भजन संध्या जपत असतात उत्कृष्ट अशा पद्धतीची भजनी मंडळ या गावांमध्ये महानुभाव संप्रदायातील आहे.