चोपडेकरांच्या अन्नत्याग सत्याग्रहास अमळनेरकरांचा जाहीर पाठिंबा..कोळी महासंघ व कोळी समाज पंच मंडळातर्फे प्रांताधिकार्‍यांना निवेदन.

 चोपडेकरांच्या अन्नत्याग सत्याग्रहास अमळनेरकरांचा जाहीर पाठिंबा..कोळी महासंघ व कोळी समाज पंच मंडळातर्फे प्रांताधिकार्‍यांना निवेदन..


चोपडा दि.४(प्रतिनिधी):-*  चोपडा व अमळनेर तालुक्यातील आदिवासी कोळी लोकांना टोकरेकोळी (एसटी) चे जातप्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळावेत, यासाठी चोपडा म.वाल्मिकी समाज मंडळाचे तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर ( गोरगावले बुद्रुक) यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. ८ / ५ / २०२३ (वार- सोमवार) रोजी स. ११ वाजेपासून शेकडोंच्या संख्येने अमळनेर येथील उपविभागीय (प्रांत) अधिकारी यांच्या कार्यालयासमोर तीव्र अन्नत्याग सत्याग्रह करण्यात येणार आहे. यासाठी अमळनेर येथील कोळी महासंघ व कोळी समाज पंच मंडळाने पाठिंबा जाहिर केलेला आहे. त्याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी यांचे प्रतिनिधी पुरवठा अधिकारी संतोष बावणे यांना देण्यात आले.

           याप्रसंगी अमळनेर तालुका कोळी महासंघ व कोळी  समाज पंच मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनावर हिलाल सैंदाणे, रामचंद्र सपकाळे, सुखदेव सोनवणे, विनोद सोनवणे, राकेश ठाकरे, भूषण कोळी, महेंद्र कोळी, बारकू कोळी, लोटन कोळी, हिम्मत कोळी, चंद्रकांत कोळी, प्रवीण कोळी, किरण शिरसाठ, राकेश कोळी, बापू सैंदाणे, विनायक कोळी तसेच चोपडा येथील जेष्ठ समाजसेवक लखिचंद बाविस्कर, सामा. कार्यकर्ते जगन्नाथ बाविस्कर, डॉ.अशोक बाविस्कर, मधुसूदन बाविस्कर, मोतीलाल रायसिंग, भरत पाटील विदगावकर, लिलाधर कोळी, वैभवराज बाविस्कर यांच्या स्वाक्षर्या आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने