बहादरवाडी येथे ओंकारेश्वर महादेव मंदिरात आज महाप्रसाद भंडारा कार्यक्रम

 बहादरवाडी येथे ओंकारेश्वर महादेव मंदिरात आज महाप्रसाद भंडारा कार्यक्रम

अमळनेर दि.०४(प्रतिनिधी): तालुक्यातील बहादरवाडी  येथे  ओंकारेश्वर महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची स्थापना मोठ्या उत्साहात झाला असूनआज दि.४रोजी सकाळी १० ते १ वाजेच्या दरम्यान महाप्रसाद भंडारा कार्यक्रम होत आहे.

  जळगाव जिल्ह्यात बोरी व गोपी नदीच्या काठावर वसलेले येथील संगमेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेल्या ओंकारेश्वर महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा स्थापना अति उत्साहाने तसेच समस्त बहादरवाडी ग्रामस्थ मंडळी व पंचक्रोशीतील सर्व भक्त जणांच्या समक्ष प्राचीन काळातील मूर्तीची स्थापना झाली .प.पू.संत श्री.ईश्वरदासजी महाराज (नंदगाव) यांच्या शुभहस्ते प्राणप्रतिष्ठेच्या सोहळा पार पडला. तरी भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन  आयोजक समस्त ग्रामस्थ मंडळी बहादरवाडी यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने