चोपडा आगारातील चालक वाहकांचा प्रामाणिकपणा
महीला प्रवासीची हरवलेली पर्स परत करताना आगार प्रमुख महेंद्र पाटील, परेश बोरसे, नितीन सोनवणे,डि डि चावरे व प्रवासी महीला संगिता महाजनवर्डी ता चोपडादि.३१ (वार्ताहर)आजच्या धावपळीच्या जगात अनेक फसवणुकीचे,चोरी चपाटी लुटमार ,गंडविणे अश्या अनेक घटना घडत असतात तर एस टीच्या प्रवासात तर रोज काही ना काही घटना घडत असतात व प्रामाणिकपणा व इमानदारी राहीली नाही असे वाटायला लागलेय परंतु चोपडा आगारातील चालक वाहकांनी बस मध्ये सापडलेले २१२०० रुपये व मौल्यवान वस्तु परत करून आजही प्रामाणिकपणा व इमानदारी राहीली आहे,हे सिध्द करुन दिले.या बाबत सविस्तर वृत्त असे कि दि ३० मे रोजी ड्युटी क्र ५५ शिरपुर हुन चोपडा येत असलेली बस क्र २०८१ मध्ये प्रवास करीत असलेली प्रवाशी संगिता ज्ञानेश्वर महाजन निपाने ता एरंडोल ह्या चोपडा बस स्थानकावर घाई गर्दीत उतरुन निघुन गेल्या होत्या.परंतु त्यांची मौल्यवान वस्तू व २१२०० रुपये असलेली पर्स गाडीतच राहील्याच्या लक्षात आल्यावर त्यांनी वाहतुक नियंत्रक अशोक पाटील यांना गाडीत पर्स हरविल्याची सांगितले त्यांनी सदर वाहनावरील वाहक कालीदास बाविस्कर व चालक संदिप तायडे यांच्याशी संपर्क साधुन गाडीत राहीलेली पर्स आगार प्रमुख महेंद्र पाटील यांच्या कडे जमा केली व ती मौल्यवान वस्तुची पर्स परत करून आजही माणुसकी व प्रामाणिकपणा आहे हे सिध्द केले.संगिता महाजन यांनी चालक वाहक व अधिकार्यांचे तत्पर सेवा कर्तव्यदक्ष पणाचे कौतुक करुन आभार व्यक्त मानले.
( महीला प्रवासीची हरवलेली पर्स परत करताना आगार प्रमुख महेंद्र पाटील, परेश बोरसे, नितीन सोनवणे,डि डि चावरे व प्रवासी महीला संगिता महाजन)